लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमाेरी : येथील भारतीय स्टेट बॅंक शाखा आरमाेरीचे एटीएम मार्च २०२० पासून जळाल्यामुळे ते आजपर्यंत बंद अवस्थेत आहे. परिणामी ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बॅंकेत जाऊन प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्राहकांची गैरसाेय टाळण्यासाठी आरमाेरी शहरातील हे एटीएम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात स्टेट बॅंक शाखा आरमाेरीच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर कासवीचे माजी उपसरपंच प्रवीण रहाटे, ओमकार इनकने, मंगेश बाेबाटे, राकेश मंगरे, दिलीप इनकने, याेगेश कामडे, सुमित सयाम, ईश्वर गुरनुले, कृष्णा मट्टे आदीसह इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, आरमाेरी येथील स्टेट बॅंक शाखेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी हाेत आहे. दुसऱ्या एटीएमकडे धाव घ्यावी लागत असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या सात दिवसांत बंद असलेले एटीएम सुरू करावे, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.