मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:29 AM2019-02-18T00:29:36+5:302019-02-18T00:30:22+5:30

जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली येथे येत आहेत. मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

A strong settlement of the chief minister's program | मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला तगडा बंदोबस्त

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला तगडा बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती : आज विविध प्रकल्पांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली येथे येत आहेत. मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पोलिसांतर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, परीवहन मंत्री दिवाकर रावते, आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, कृषी व फलोत्पादन मंत्री सदाशिव खोत, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष संजय धोत्रे, जि. प. च्या अध्यक्ष योगिता भांडेकर, खा. अशोक नेते, आ. रामदास आंबटकर, आ. नागो गाणार, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे आदी मान्यवरासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीचे ई - उद्घाटन, आरमोरी मार्गावरील कठाणी नदीवरील मोठ्या पुलाचे ई - लोकार्पण, जिल्ह्यातील हायब्रीड अन्युअटी अंतर्गत रस्त्यांच्या २ कामांचे ई - भूमीपुजन, जिल्ह्यातील विविध १८ कामांचे ई - भूमिपुजन, अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रूग्णालयाच्या इमारत बांधकामाचे ई - भूमिपुजन, गती - २ अंतर्गत एससी, एसटी प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांना ट्रकचे वाटप आदी कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.

Web Title: A strong settlement of the chief minister's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.