लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पार्सल व कुरिअरच्या खासगी सेवा उपलब्ध झाल्या असल्या तरी बहुतांश नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या तालुका व जिल्हास्तरावर असलेल्या आगारातील पार्सल सेवेचा लाभ घेतात. मात्र, गडचिराेली एसटी आगारातील पार्सलचे कार्यालय अनियमित सुरू राहत असल्याने प्रवासी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
१० फेब्रुवारी राेजी प्रस्तुत प्रतिनिधीने या भागात जाऊन पाहणी केली असता, येथील पार्सल कार्यालय बंदस्थितीत आढळून आले. प्रवासी व नागरिकांकडे चाैकशी केली असता, गेल्या पाच दिवसांपासून एसटीचे हे पार्सल कार्यालय बंद असल्याचे सांगितले. राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन एसटीचे हे पार्सल कार्यालय नियमित व दरराेज सुरू राहण्यासाठी उचित कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गडचिराेली आगारातील एसटीचे पार्सल कार्यालय नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.