शाश्वत शेती म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 01:04 AM2019-02-17T01:04:44+5:302019-02-17T01:09:41+5:30
पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे,
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) गडचिरोली जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १४ फेब्रुवारीला नैनपूर येथील भाग्यलक्ष्मी सेंद्रीय गटचे गजेंद्र ठाकरे यांच्या सेंद्रीय शेतात करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल उईके, प्रमुख मार्गदर्शक युगेश रणदिवे, तालुका कृषी अधिकारी राटोड, महेंद्र दोनाडकर, प्रगतशील शेतकरी बांबोलकर, भाजीपाले, ठाकरे, अण्णाजी तुपत, गोविंदराव नागपूरकर, हरडे उपस्थित होते
यावेळी भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटांनी तयार केलेल्या कमी खर्चातील गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन करून आमदार गजबे आपल्या भाषणात या गटाच्या कामाचे कौतुक केले. या गटांनी चालू केलेल्या सेंद्रीय प्रकल्पाला शेतकºयांनी भेट द्यावी व एकत्र येऊन शेती करावी, असे मार्गदर्शन केले. महेंद्र दोनाडकर यांनी जीवामृत वेस्ट डीकंपोजर गांडूळ खत यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
कार्यक्रमाचे संचालन योगेश बोरकर, प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी युगेश रणदिवे यांनी तर आभार कल्पना ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक परिवेक्षक व भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटाच्या सदस्यांनी सहकार्य केले.