मुलाच्या प्राणासाठी मातेचा टाहो

By admin | Published: August 1, 2014 12:16 AM2014-08-01T00:16:33+5:302014-08-01T00:16:33+5:30

घरातील आर्थिक स्थिती बेताची असतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितांनाच आईची परवड होत होती. त्यातच कुटुंबाची एकच आस असलेला मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त झाला आहे.

Taha of the mother for the child's life | मुलाच्या प्राणासाठी मातेचा टाहो

मुलाच्या प्राणासाठी मातेचा टाहो

Next

मदतीची याचना : उपचारासाठी २५ लाखांचा खर्च अपेक्षित
देसाईगंज : घरातील आर्थिक स्थिती बेताची असतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितांनाच आईची परवड होत होती. त्यातच कुटुंबाची एकच आस असलेला मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त झाला आहे. ही माहिती समोर येताच आईच्या हृदयावर दु:खाचे डोंगर कोसळले. नि माहित झाले की, मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. दु:खाच्या या घटनेने आईचे हृदय हेलावून गेले. ती मदतीसाठी टाहो फोडू लागली... कुणीतरी मदत करा. ही हृदयद्रावक घटना आहे देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील. मुलाच्या उपचारासाठी २५ लाखांचा खर्च येणार, असे माहित होताच आई माया लांडगे मदतीसाठी लोकांकडे हात पसरू लागली.
घरात पिढ्यान्पिढ्या दारिद्र्याचा वास असतांना रोजंदारीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाचा आधार मुलगा ठरावा म्हणून आई माया सिद्धार्थ लांडगे यांनी मुलगा पंकज सिद्धार्थ लांडगे (२२) याला १२ वीपर्यंत शिकविले. यंदाच तो १२ वीची परीक्षाही उत्तीर्ण झाला. परिस्थिती बेताची असल्याने एका खासगी रूग्णालयात रोजंदारीने काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र मागील एक महिन्यापासून तो किडनीच्या आजाराने त्रस्त होता. प्रकृती बिघडल्याने पंकजला कुरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. परंतु पुढील उपचार करण्यासाठी प्रथम गडचिरोली येथील रूग्णालयात त्यानंतर वर्धा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु पंकजच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, यासाठी २५ लाखांचा खर्च येणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीन सरकली. रोजंदारीच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना २५ लाखांची रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न माया लांडगे यांना पडला. मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी दात्यांनी मदत करावी म्हणून ती अजूनही भटकत आहे. त्यामुळे उदार अंत:करणाने मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करावी, असा टाहो मायाबाई लांडगे फोडत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Taha of the mother for the child's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.