मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई करा

By admin | Published: August 4, 2014 11:43 PM2014-08-04T23:43:56+5:302014-08-04T23:43:56+5:30

१ आॅगस्टच्या रात्री ट्रॅक्टर अडवून चालक व मालकास बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सरफराज शेख यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

Take action against the assaulting policemen | मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई करा

मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई करा

Next

धानोरा : १ आॅगस्टच्या रात्री ट्रॅक्टर अडवून चालक व मालकास बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सरफराज शेख यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
१ आॅगस्टच्या रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान सरफराज शेख यांच्या मालकीचे ट्रॅक्टर धानोरा येथील तुलावी टोल्यावरून चालक जेवण करून आणत होता. दरम्यान कोर्टाजवळ उपविभागीय पोलीस कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक पारखे यांनी ट्रॅक्टर अडविले व ट्रॅक्टर कोणाची आहे या संदर्भात चौकशी केली व त्यानंतर सरफराज शेख यांना बोलाविले. तू अवैध धंदे करून कमाई करीत आहेस, नक्षल सप्ताह असतांनाही रात्री उशीरापर्यंत ट्रॅक्टर कुठे नेली होती असे सुनावले. त्यानंतर ५० हजार रूपये दंड भर अन्यथा तुझी ट्रॅक्टर ठाण्यात जमा केली जाईल, नाहीतर नक्षल समर्थक म्हणून गुन्हा दाखल करू अशी धमकी पोलीस उपनिरीक्षकाने दिली व भरपावसात ३०० दंडबैठका मारायला लावले. सरफराज शेख व राकेश दास यांना मारहाणही केली व नक्षली समर्थक ठरविण्याची धमकीही दिली. त्यामुळे बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे महामंत्री कै लास गुंडावार, तालुकाध्यक्ष गोपाल उईके, भाजप युवामंचाचे अध्यक्ष साजन गुंडावार, नितेश राऊत, हेमंत कुमरे, राकेश दास, बाळू उंदिरवाडे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Take action against the assaulting policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.