शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई करा

By admin | Published: August 04, 2014 11:43 PM

१ आॅगस्टच्या रात्री ट्रॅक्टर अडवून चालक व मालकास बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सरफराज शेख यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

धानोरा : १ आॅगस्टच्या रात्री ट्रॅक्टर अडवून चालक व मालकास बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सरफराज शेख यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. १ आॅगस्टच्या रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान सरफराज शेख यांच्या मालकीचे ट्रॅक्टर धानोरा येथील तुलावी टोल्यावरून चालक जेवण करून आणत होता. दरम्यान कोर्टाजवळ उपविभागीय पोलीस कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक पारखे यांनी ट्रॅक्टर अडविले व ट्रॅक्टर कोणाची आहे या संदर्भात चौकशी केली व त्यानंतर सरफराज शेख यांना बोलाविले. तू अवैध धंदे करून कमाई करीत आहेस, नक्षल सप्ताह असतांनाही रात्री उशीरापर्यंत ट्रॅक्टर कुठे नेली होती असे सुनावले. त्यानंतर ५० हजार रूपये दंड भर अन्यथा तुझी ट्रॅक्टर ठाण्यात जमा केली जाईल, नाहीतर नक्षल समर्थक म्हणून गुन्हा दाखल करू अशी धमकी पोलीस उपनिरीक्षकाने दिली व भरपावसात ३०० दंडबैठका मारायला लावले. सरफराज शेख व राकेश दास यांना मारहाणही केली व नक्षली समर्थक ठरविण्याची धमकीही दिली. त्यामुळे बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे महामंत्री कै लास गुंडावार, तालुकाध्यक्ष गोपाल उईके, भाजप युवामंचाचे अध्यक्ष साजन गुंडावार, नितेश राऊत, हेमंत कुमरे, राकेश दास, बाळू उंदिरवाडे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)