दुसऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:37+5:30
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, प्राचार्य डॉ.राजेंद्र घोनमोडे, प्रा.शशिकांत गेडाम आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : वाहनचालकाने स्वत:च्या सुरक्षिततेपेक्षा दुसºयाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघात टळतील. त्यासाठी वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले.
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, प्राचार्य डॉ.राजेंद्र घोनमोडे, प्रा.शशिकांत गेडाम आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना भुयार म्हणाले, मानवी वृत्तीत चांगले आचार घडून येण्यासाठी मनात प्रथम चांगले विचार निर्माण होणे आवश्यक आहे. आजचा तरुण विद्यार्थी मुळातच सद्विचारी आहे. परंतु कुणीतरी मार्इंड हायजॅक करून त्याचा स्वार्थासाठी वापर करीत आहे. एक बीज ज्याप्रमाणे जमिनीत स्वत:ला नष्ट करवून घेते. परंतु त्याच बिजापासून येणाºया रोपट्यातून हजारो बीज जन्म घेतात, ही सृजनतेची भावना निर्माण झाली आणि दुसऱ्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघात टळण्यास मदत होईल, असे मौलिक मार्गदर्शन भुयार यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा म्हणाले, नागरिकांना केवळ रस्ता सुरक्षेचे नियम माहित असणे आवश्यक असून चालणार नाही. तर त्या नियमांचे तंतोतंत पालन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तरुणांनी इतरांच्या जगण्याचे मूल्य समजून घेतल्यास रस्ता सुरक्षेचे प्रश्न सहज सुटू शकतील, असे खालसा यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षाविषयक विविध प्रश्न आरटीओ रवींद्र भुयार यांना विचारले. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
प्रास्ताविक प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, संचालन डॉ.विजय रैवतकर यांनी केले तर आभार प्रा.शशिकांत गेडाम यांनी मानले.
यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत घोनमोडे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.