गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकाकडून महिला पोलिसाचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 08:36 PM2020-08-03T20:36:27+5:302020-08-03T20:37:32+5:30

चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस शिपायाचा त्याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी कुरखेडा मार्गावरील एकलपूरजवळ घडली.

Teacher molestes policewoman in Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकाकडून महिला पोलिसाचा विनयभंग

गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकाकडून महिला पोलिसाचा विनयभंग

Next
ठळक मुद्देचेकपोस्टवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुरखेडा मार्गावरील एकलपूरजवळ चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. या चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस शिपायाचा त्याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
सुनील भरणे असे विनयभंग करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. भरणे हा देसाईगंज तालुक्यातील मोहटोला येथील शाळेत शिक्षक आहे. त्याच्याविरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३५४ (२), व्हीए ३ (१) (डब्ल्यू) १ तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्हामुळे पीडित महिला शिपायाची तब्येत बिघडली होती. ती तंबूमध्ये विश्रांती घेत असताना भरणे याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा पुढील तपास एसडीपीओ जयदत्त भंवर करीत आहेत.

Web Title: Teacher molestes policewoman in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.