समायोजन प्रक्रियेसाठी शिक्षकांची गर्दी

By admin | Published: August 4, 2014 11:43 PM2014-08-04T23:43:16+5:302014-08-04T23:43:16+5:30

राज्य शासनाच्यावतीने सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या पट पडताळणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. या अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील जि.प. शाळेत

Teachers crowd for adjustment process | समायोजन प्रक्रियेसाठी शिक्षकांची गर्दी

समायोजन प्रक्रियेसाठी शिक्षकांची गर्दी

Next

रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरूच : जिल्हा परिषदेत दुर्गम भागातील शिक्षकांचा ठिय्या
गडचिरोली : राज्य शासनाच्यावतीने सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या पट पडताळणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. या अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील जि.प. शाळेत सामावून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने सोमवारी जि.प.च्या शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृहात स्लाईड प्रोजेक्टरद्वारे समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. समायोजनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी बाराही तालुक्यातील पात्र शिक्षकांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. यावेळी जि.प. ला मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सन २०११ मध्ये शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या पटपडताळणीदरम्यान अनेक जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी आढळली होती. यामुळे विद्यार्थी पटसंख्येनुसार अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. शिक्षण विभागाच्यावतीने समायोजन प्रक्रियेसाठी पहिल्या दिवशी सोमवारी बी.ए. व बी.एड् झालेल्या जिल्हाभरातील ६०० पदवीधर प्राथमिक शिक्षकांना बोलाविण्यात आले होते. शिक्षण विभागाला अतिरिक्त ठरलेल्या एकूण ४४३ शिक्षकांचे समायोजन करावयाचे आहे. सदर समायोजन प्रक्रिया आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे. वीर बाबुराव शेडमाके सभागृहात समायोजन प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यासह बाराही तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते. पात्र शिक्षकांची स्लाईड प्रोजेक्टरवर यादी दाखवून प्राधान्य क्रमानुसार समायोजन प्रक्रिया सुरू होती. शिक्षण विभागाने आजच्या समायोजन प्रक्रियेत विधवा, परित्यक्ता/कुमारिका, अपंग कर्मचारी, सतत गंभीर आजाराने ग्रस्त तसेच सैनिक, अर्धसैनिकांची पत्नी आणि पती, पत्नी एकत्रिकरण असा प्राधान्यक्रम समायोजनासाठी ठेवण्यात आला होता. यापूर्वी शिक्षण विभागाने समायोजन प्रक्रिया आयोजित केली होती. मात्र पूर परिस्थितीमुळे प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. समायोजन प्रक्रियेदरम्यान जि.प.समोर रस्त्यावर वाहनांची रिघ लागली होती.

Web Title: Teachers crowd for adjustment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.