शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

समायोजन प्रक्रियेसाठी शिक्षकांची गर्दी

By admin | Published: August 04, 2014 11:43 PM

राज्य शासनाच्यावतीने सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या पट पडताळणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. या अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील जि.प. शाळेत

रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरूच : जिल्हा परिषदेत दुर्गम भागातील शिक्षकांचा ठिय्यागडचिरोली : राज्य शासनाच्यावतीने सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या पट पडताळणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. या अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील जि.प. शाळेत सामावून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने सोमवारी जि.प.च्या शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृहात स्लाईड प्रोजेक्टरद्वारे समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. समायोजनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी बाराही तालुक्यातील पात्र शिक्षकांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. यावेळी जि.प. ला मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सन २०११ मध्ये शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या पटपडताळणीदरम्यान अनेक जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी आढळली होती. यामुळे विद्यार्थी पटसंख्येनुसार अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. शिक्षण विभागाच्यावतीने समायोजन प्रक्रियेसाठी पहिल्या दिवशी सोमवारी बी.ए. व बी.एड् झालेल्या जिल्हाभरातील ६०० पदवीधर प्राथमिक शिक्षकांना बोलाविण्यात आले होते. शिक्षण विभागाला अतिरिक्त ठरलेल्या एकूण ४४३ शिक्षकांचे समायोजन करावयाचे आहे. सदर समायोजन प्रक्रिया आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे. वीर बाबुराव शेडमाके सभागृहात समायोजन प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यासह बाराही तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते. पात्र शिक्षकांची स्लाईड प्रोजेक्टरवर यादी दाखवून प्राधान्य क्रमानुसार समायोजन प्रक्रिया सुरू होती. शिक्षण विभागाने आजच्या समायोजन प्रक्रियेत विधवा, परित्यक्ता/कुमारिका, अपंग कर्मचारी, सतत गंभीर आजाराने ग्रस्त तसेच सैनिक, अर्धसैनिकांची पत्नी आणि पती, पत्नी एकत्रिकरण असा प्राधान्यक्रम समायोजनासाठी ठेवण्यात आला होता. यापूर्वी शिक्षण विभागाने समायोजन प्रक्रिया आयोजित केली होती. मात्र पूर परिस्थितीमुळे प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. समायोजन प्रक्रियेदरम्यान जि.प.समोर रस्त्यावर वाहनांची रिघ लागली होती.