प्रेतांवर अग्निसंस्कारासाठी जागा अपुरी पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:33 AM2021-04-14T04:33:45+5:302021-04-14T04:33:45+5:30

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने १५७ जणांचा बळी घेतला आहे. मंगळवारी नोंद केलेल्या २० मृत्यूंपैकी दहा गडचिरोली जिल्ह्यातील, सात चंद्रपूर ...

There was not enough space for cremation | प्रेतांवर अग्निसंस्कारासाठी जागा अपुरी पडली

प्रेतांवर अग्निसंस्कारासाठी जागा अपुरी पडली

Next

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने १५७ जणांचा बळी घेतला आहे. मंगळवारी नोंद केलेल्या २० मृत्यूंपैकी दहा गडचिरोली जिल्ह्यातील, सात चंद्रपूर जिल्ह्यातील तर यवतमाळ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. त्या सर्वांवर गडचिरोलीतच अंत्यसंस्कार केले जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील मृत्यूमध्ये गडचिरोली शहरातील गोकुलनगरातील ६४ वर्षीय महिला, कलेक्टर कॉलनीतील ७८ वर्षीय महिला, आरमोरीतील ५२ वर्षीय पुरुष, विसोरा, ता.देसाईगंज येथील ४० वर्षीय पुरुष, देसाईगंजमधील ५७ वर्षीय महिला, विहीरगाव येथील ५३ वर्षीय पुरुष, एक ५५ वर्षीय महिला, एकलापूर, ता.देसाईगंज येथील ५७ वर्षीय पुरुष, कुरखेडा येथील ६०वर्षीय पुरुष, नवेगाव कॉम्प्लेक्स येथील ६२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मृतांमध्ये ६५ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, २७ वर्षीय पुरुष आणि ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील ५५ वर्षीय महिला, नागपूर जिल्ह्यातील ५० वर्षीय पुरुष आणि भंडारा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८० टक्के आहे, तर मृत्युदर १.२१ टक्क्यांवर गेला आहे. मंगळवारी १०८ जणांनी कोरोनावर मात केली.

Web Title: There was not enough space for cremation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.