शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ८ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
3
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
4
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
5
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
6
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
7
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
8
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
9
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
10
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
11
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
12
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
13
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
14
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
15
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
16
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
17
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
18
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
19
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
20
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

चोरी झालेली २० वाहने केली परत

By admin | Published: June 07, 2017 1:13 AM

गडचिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी लांबविलेल्या दुचाकी गडचिरोली पोलिसांनी शोधून काढल्या.

पोलीस विभागाचा पुढाकार : सिरोंचा येथील चोरट्यांनी चोरल्या दुचाकी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी लांबविलेल्या दुचाकी गडचिरोली पोलिसांनी शोधून काढल्या. मंगळवार ६ जून रोजी चोरट्यांकडून ताब्यात घेतलेली २० दुचाकी वाहने दुुचाकी मालकांच्या ताब्यात देण्यात आली. सिरोंचा येथील मधुकर समय्या तुलसिगिरी, शफीक अंकुशा शेख व सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील सतीश बापू राऊत या तिन्ही चोरट्यांनी गडचिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरून नेल्या होत्या. या तिघांनाही गडचिरोली पोलिसांनी सिरोंचा येथून अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल २० दुचाकी वाहने जप्त केली होती. गडचिरोली येथील खुशाल वाघमोडे यांची एमएच ३३ जे ४०५९ क्रमांकाची दुचाकी, चंद्रपूर जिल्ह्यातील रूद्रापूर येथील गोपाल केशव उरकुडे यांची एमएच ३४ एएफ ३२४९ क्रमांकाची दुचाकी, भक्तदास भानारकर रा. साखरा यांची एमएच ३३ एन ७४४६ क्रमांकाची दुचाकी, घुटकाळा वार्ड चंद्रपूर येथील आशिफ युसूफ शेख यांची एमएच ३४ - ३०४३ क्रमांकाची दुचाकी, हनुमान वार्ड गडचिरोली येथील विजय चापले यांची एमएच ३३ के ५४३३ क्रमांकाची दुचाकी, विवेक साखरे रा. एटापल्ली यांची एमएच ३५ व्ही १८२१ क्रमांकाची दुचाकी, केमदेव चिचघरे रा. उधमपेठ ता. मुल, गोकुलनगर गडचिरोली येथील बाळकृष्ण लांजेवार, आरमोरी येथील नितेश भोवते, नितेश गणपत कुसराम रा. तुलतुली प्रकल्प गडचिरोली, रामपुरी वार्ड गडचिरोली येथील नेताजी करंबे, रामपुरी वार्ड गडचिरोली येथील मंगेश मधुकर बुुरांडे, मोहटोला येथील दिशांत पत्रे, नवेगाव कॉम्प्लेक्स येथील विकास कुनारपवार, गुरवळा येथील धिरज गेडाम, साईमंदिर गडचिरोली येथील शंकरराव मडावी, गोकुलनगर गडचिरोली येथील महेंद्र शेडमाके, सालईटोला येथील देवानंद सेमसकर, वैरागड येथील आशिष चौधरी व रामपुरी वार्ड गडचिरोली येथील शरद लोणारे यांची दुचाकी या चोरट्यांनी लांबविली होती. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात भादंवी ३७९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार अमृत राठोड, पोलीस हवालदार चिमणकर, सहाय्यक फौजदार घोडाम, पोलीस हवालदार इरमलवार, भारत रामटेके, सहाय्यक फौजदार पत्रे, पोलीस शिपाई केदार, पोलीस हवालदार रामटेके, ढोरे, नाईक पोलीस शिपाई झाडे, मारोती धरणी, हिडामी, मानकर यांनी केला होता. या तिन्ही चोरट्यांना गडचिरोली पोलिसांनी सिरोंचा येथून ताब्यात घेतल्यानंतर दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली होती. आरोपींना गडचिरोली न्यायालयाने कारागृहात रवानगी केली होती. जप्त करण्यात आलेल्या दुचाकीच्या चाव्या मंगळवारी दुचाकी मालकांना गडचिरोली पोलीस ठाण्यात बोलावून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्याहस्ते देण्यात आल्या. यामुळे दुचाकी मालकांनी गडचिरोली पोलिसांचे आभार मानले आहे.