‘त्या’ भ्रष्टाचाराची चौकशी करा
By admin | Published: March 11, 2016 12:58 AM2016-03-11T00:58:45+5:302016-03-11T00:58:45+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत लघु सिंचन विभागातर्फे तलाव दुरुस्ती, पाझर तलाव, माजी मालगुजारी तलाव व कोल्हपुरी बंधारा दुरुस्तीबाबत
ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन : शिवसेनेची मागणी
भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत लघु सिंचन विभागातर्फे तलाव दुरुस्ती, पाझर तलाव, माजी मालगुजारी तलाव व कोल्हपुरी बंधारा दुरुस्तीबाबत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला असून याची चौकशी करुन संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे संजय रेहपाडे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.
जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत लघुसिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी सदर गैरव्यवहार केल्याचेही मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून नमुद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १०० ब नुसार राज्य शासनाने हस्तांतरण केलेल्या योजनेनुसार सदर योजना अनुसूचिप्रमाणे असने गरजेचे आहे. परंतु सर्वेक्षणाची योजना १-२ अनुसूचित समाविष्ट नाही. उपविभागीय अभियंत्यानी आपल्या स्तरावर प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी रेहपाडे यांनी केली आहे.