विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू

By admin | Published: July 27, 2014 11:44 PM2014-07-27T23:44:52+5:302014-07-27T23:44:52+5:30

सिरोंचा तालुक्यातील आरडा गावातील शेतकऱ्याच्या तीन म्हशी रविवारी दुपारी ३ वाजता विजेचा धक्का लागून मरण पावल्या. या घटनेत शेतकऱ्याचे १ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.

Three buffaloes die due to electric shocks | विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू

Next

आरडा गावातील घटना : शेतकऱ्याचे एक लाखांचे नुकसान
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील आरडा गावातील शेतकऱ्याच्या तीन म्हशी रविवारी दुपारी ३ वाजता विजेचा धक्का लागून मरण पावल्या. या घटनेत शेतकऱ्याचे १ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या आरडा येथे बैकन राजन्ना या शेतकऱ्याच्या तीन म्हशी चरण्यासाठी शेतशिवारात गेल्या होत्या. या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असलेला तार तुटून पडलेला होता. तिनही म्हशींचा जीवंत विद्युत तारेशी स्पर्श झाल्याने त्या जागीच मरण पावल्या. सिरोंचा तालुक्यातील आरडा भागात पावसाळ्याच्या दिवसात वीज कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना घडली आहे. शेतकऱ्याचे या घटनेत १ लाख रूपयाचे नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीचे सिरोंचा येथील कनिष्ठ अभियंता कटकमवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व शेतकऱ्याला शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे शेतकरी बैकन राजन्ना यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला त्वरीत आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसात विजेच्या जीवंत तारेचा धक्का लागून ५ ते ७ जणावरे दगावले आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Three buffaloes die due to electric shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.