जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायती ओडीएफ प्लस घाेषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:41 AM2021-08-17T04:41:56+5:302021-08-17T04:41:56+5:30
गडचिरोली जिल्ह्याचा ग्रामीण भाग मार्च २०१९ साली हगणदारीमुक्त झाला आहे. आता ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ...
गडचिरोली जिल्ह्याचा ग्रामीण भाग मार्च २०१९ साली हगणदारीमुक्त झाला आहे. आता ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मध्ये वैयक्तिक शौचालय, बांधकाम व त्याचा वापर करणे, त्याची शाश्वता राखणे, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, शाळा व अंगणवाडी व सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छताविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे. गाव स्वच्छ ठेवणे आदी काम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ४ तालुके गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज आणि मुलचेरा मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण ४ तालुके हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणुसमारे, स्वच्छतातज्ज्ञ अमित पुंडे, शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार शैलेश ढवस व गावातील सचिव, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर उपस्थित होते.