विषयुक्त चाऱ्याने तीन जनावरे दगावले
By admin | Published: June 26, 2016 01:26 AM2016-06-26T01:26:49+5:302016-06-26T01:26:49+5:30
विषयुक्त चारा खाल्ल्याने तीन जनावरे दगावल्याची घटना शुक्रवारी चामोर्शी तालुक्यातील नवेगाव (माल) येथे उघडकीस आली.
चामोर्शी : विषयुक्त चारा खाल्ल्याने तीन जनावरे दगावल्याची घटना शुक्रवारी चामोर्शी तालुक्यातील नवेगाव (माल) येथे उघडकीस आली.
शेतकरी पत्रू तानू पिटाले यांचा एक बैल, विठ्ठल कवडू गायकवाड यांची एक गाय व चंद्रकांत कवडू बांगरे यांची एक गाय शेत शिवाराच्या परिसरात चरण्यासाठी गेली होती. सायंकाळ होऊनही जनावरे घरी न परतल्याने शोध घेण्यात आला. यावेळी गावाच्या एक किमी अंतरावर तीन जनावरे मृतावस्थेत आढळून आले. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी तलाठी कुरूडकर, डॉ. सुहास रोडे, डॉ. अरविंद कस्बे, डॉ. उमेश नैताम, माजी सरपंच देवानंद दुर्गे व शेतकरी उपस्थित होते. आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.