सिंचनासाठी पाठपुरावा करून थकले झिंगानूरवासीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:33 AM2021-04-14T04:33:51+5:302021-04-14T04:33:51+5:30

झिंगानूर : झिंगानूर हा आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीवरच उपजीविका करावी लागते; ...

Tired of pursuing for irrigation | सिंचनासाठी पाठपुरावा करून थकले झिंगानूरवासीय

सिंचनासाठी पाठपुरावा करून थकले झिंगानूरवासीय

Next

झिंगानूर : झिंगानूर हा आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीवरच उपजीविका करावी लागते; मात्र सिंचनाअभावी शेतीसुद्धा साथ देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दारिद्र्यात जीवन जगावे लागते. सिंचन सुविधा निर्माण करून द्याव्या यासाठी झिंगानूर परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांच्या पाठपुराव्याला यश आले नाही.

सिरोंचा तालुक्यात पाणी पातळी अधिक आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बोअरवेल किंवा विहीर देण्याची मागणी आहे. तालुक्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. या भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने शेती बेभरवशाची झाली आहे. झिंगानूर परिसरातील सर्वच गावे जंगलाने व्यापली आहेत. तालुकास्थळापासून झिंगानूर सुमारे ४० किमी अंतरावर आहे. या परिसरात राेजगाराचे साधन नसल्याने युवक केवळ शेती करून जीवन जगतात. सिंचनाची सुविधा नसल्याने शेतीतून उत्पन्न काढण्यासाठीसुद्धा मर्यादा पडतात. पावसाळ्यात केवळ धानाचे उत्पादन घेतले जाते. सिंचनाची सुविधा नसल्याने बहुतांश शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. वेळेवर पावसाने दगा दिल्यास धानाचेही उत्पादन हाेत नाही.

Web Title: Tired of pursuing for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.