चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. काही प्रमाणात सोयाबीन, कापूस पिकाचे उत्पादन घेतले जाते; मात्र यावर्षी रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाचे काही प्रमाणात आगमन झाले. त्यानुसार खरीप हंगामात शेती कामाला सुरुवात झाली होती. शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे १०० टक्के टाकले हाेते. मृग संपल्यावर आर्द्रा नक्षत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस येईल रोवणीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र तेथेही पावसाने हुलकावणी दिली. दरम्यान, तापमानात अचानक वाढ झाली. धान पऱ्ह्यांची वाढ खुंटली आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. दुबार पेरणीचे संकट येईल का? या विवंचनेत असताना हवामान खात्याने राज्यात १० जुलैपासून पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज वर्तविला. शेतकरी या आशेवर असतानाच आज ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आभाळ भरून आले आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणातच पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी आल्या. भेंडाळा, चामोर्शी, आष्टी, येनापूर, कुनघाडा परिसरात पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेती कामासाठी उत्साह दिसून आला.
बॉक्स
कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी हंगाम करावा. पावसाबाबतचा अंदाज हवामान विभाग वारंवार सांगत असताे. त्यानुसार पावसाची प्रतीक्षा करावी. ८ जुलै राेजी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागालाही दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी धानाच्या मुदतीनुसार राेवणीची कामे लवकर आटाेपून घ्यावीत.
सागर डांगे, तालुका कृषी अधिकारी चामाेर्शी
090721\img-20210709-wa0104.jpg
शेतात रोवणाचे काम करताना महिला मजूर वर्ग फोटो