ट्रॅक पॉर्इंटचे काम संथगतीने
By admin | Published: June 7, 2017 01:17 AM2017-06-07T01:17:24+5:302017-06-07T01:17:24+5:30
देसाईगंज मागील वर्षभरापासून रेल्वे ट्रॅक पॉर्इंटचे काम हाती घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज मागील वर्षभरापासून रेल्वे ट्रॅक पॉर्इंटचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कामाची गती अतिशय संथ असल्याने दीड वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे यावर्षीही गोंदिया व चंद्रपूर येथूनच खत आणावे लागणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज येथे एकमेव रेल्वेस्थानक आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी लागणारे खत याच ट्रॅक पार्इंटवर उतरविले जात होते. मात्र काम सुरू असल्याने गोंदिया व चंद्रपूर येथे खत उतरविले जात आहे. मागील वर्षीही चंद्रपूर व गोंदिया येथेच खत उतरवावे लागले. रेल्वे विभागाने कामाची गती वाढवून काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.