सिरोंचाजवळील प्राणहिता पुलावरून रहदारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 10:22 PM2019-06-16T22:22:38+5:302019-06-16T22:23:24+5:30

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या धर्मपुरी गावाजवळील प्राणहिता नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहेत. या पुलावरून मागील १५ दिवसांपासून रहदारी सुध्दा सुरू झाली आहे. मात्र अजूनपर्यंत औपचारिक लोकार्पणाचा सोहळा पार पडला नाही.

Traffic on Pranhita Bridge near Sironchari | सिरोंचाजवळील प्राणहिता पुलावरून रहदारी सुरू

सिरोंचाजवळील प्राणहिता पुलावरून रहदारी सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देलोकार्पणाची प्रतीक्षा : तेलंगणा व सिरोंचातील नागरिकांच्या व्यवहारांना मिळणार बळकटी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या धर्मपुरी गावाजवळील प्राणहिता नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहेत. या पुलावरून मागील १५ दिवसांपासून रहदारी सुध्दा सुरू झाली आहे. मात्र अजूनपर्यंत औपचारिक लोकार्पणाचा सोहळा पार पडला नाही. त्यामुळे एसटीची वाहतूक बंद आहे.
६३ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग सिरोंचा तालुक्यातून जातो. सदर मार्ग तेलंगणा राज्यातून आला आहे. दोन राज्यांच्या मध्ये प्राणहिता नदी आहे. या नदीवर पूल नसल्याने राष्ट्रीय महामार्गावरून होणारी वाहतूक ठप्प होती. याच मार्गावर प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने पूल मंजूर केले. २०१६ मध्ये पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. या पुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. निजामाबाद ते जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गाला पूल जोडणार आहे. या पुलामुळे तेलंगणा राज्यातील मंचेरिअल, हैदराबादला जाणे सोपे होणार आहे. सिरोंचा ते चिन्नूर मधील अंतर केवळ २१ किमी तर सिरोंचा ते मंचेरिअल या दोन ठिकाणचे अंतर ६३ किमी आहे. पूर्वीपासून सिरोंचा तालुक्याचे तेलंगणाशी रोटीबेटी व्यवहार होत आहेत. मात्र नदीतील अडचणीच्या प्रवासामुळे या व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत होते. पूल झाल्याने आता मार्ग प्रशस्त झाला आहे. या पुलाला एकूण १८ पिल्लर आहेत. पुलाची लांबी ८५५ मीटर असून सुमारे १०७ कोटी ८९ लाख रुपये खर्च झाले आहेत. बस सुरू होण्यासाठी पुलाचे लोकार्पण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलाचे लोर्कापण लवकर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Traffic on Pranhita Bridge near Sironchari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी