परिवहनला हव्यात पालिकेच्या कुबड्या
By admin | Published: March 10, 2016 02:02 AM2016-03-10T02:02:44+5:302016-03-10T02:02:44+5:30
ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या मूळ अंदाजपत्रकात ठाणे महापालिकेकडून महसुली आणि भांडवली खर्चापोटी सुमारे १४४.३४ कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवून परिवहनचा गाडा रुळावर आणण्याचा दावा केला
पत्रकार परिषद : आंबेडकर टिचर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांचे स्वीय सहायक देवेंद्र मनोहर मेश्राम यांना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य समीर केने यांनी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठाच्या व्हिडिओ कॉन्फरिन्स रूममध्ये बोलावून दरवाजा बंद करून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कुलसचिव कार्यालयाच्या महिला शिपायामार्फत मेश्राम यांना मारहाण करायला लावली, असा आरोप करीत समीर केने यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर असोसिएशन चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. इसादास भडके, सचिव प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर, प्रा. डॉ. बी. एम. कऱ्हाडे, प्रा. डॉ. संजय उराडे, प्रा. रवी वाळके, प्रा. डॉ. प्रकाश तितरे व मुनिश्वर बोरकर उपस्थित होते.
यावेळी प्रा. भडके म्हणाले, विद्यापीठात २२ फेब्रुवारी रोजी घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आहे. पदाधिकाऱ्यांनी असे कृत्य करणे योग्य नाही, या घटनेसंदर्भात स्वीय सहायक देवेंद्र मेश्राम याने गडचिरोलीच्या पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे. मात्र कारवाई झाली नाही. समीर केने यांच्यावर कारवाई करून त्यांना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (स्थानिक प्रतिनिधी)
मारहाणीची घटना विद्यापीठात घडली नाही- केने
यासंदर्भात विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य समीर केने यांची बाजू जाणून घेतली असता, केने यांनी गोंडवाना विद्यापीठात मारहाण केल्याची कोणतीही घटना घडली नाही. मला नाहक या प्रकरणात का गोवण्यात येत आहे, असा प्रश्न करून टिचर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत, विद्यापीठात शिपाई पदावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वीय सहायक देवेंद्र मेश्राम यांच्या विरोधात कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. देवेंद्र मेश्राम याने आपल्याला अर्वाच्य शब्दात बोलून माझ्याशी गैरवर्तन केले, असे तक्रारीत नमूद केले आहे. सदर प्रकार मला माहित झाल्यावर आपण दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार का करावी, याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधित कर्मचारी महिलेला न्याय मिळावा, अशी मागणी समीर केने यांनी केली.