एटापल्लीत आदिवासींचे उपोषण

By admin | Published: October 27, 2015 01:38 AM2015-10-27T01:38:31+5:302015-10-27T01:38:31+5:30

जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली यांच्या नेतृत्वात एटापल्ली तालुक्यातील आदिवासी

Tribal fasting at Etapally | एटापल्लीत आदिवासींचे उपोषण

एटापल्लीत आदिवासींचे उपोषण

Next

एटापल्ली : जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली यांच्या नेतृत्वात एटापल्ली तालुक्यातील आदिवासी महिलांनी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामसभेचे ठराव व इतर आवश्यक कृत्यांची पूर्तता करूनही प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे २००८ पासूनचे वनहक्क मंजूर करण्यात आले नाही. तिन्ही समित्यांमधील अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी जनहितवादी युवा समितीच्या वतीने अनेकवेळा रस्ता रोखो, जेलभरो, धरणे आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. मात्र आश्वासनांच्या पलीकडे प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. सदर वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे.
डुम्मे व तुमरगुंडा येथील वनहक्क दावेदारांच्या पात्र शेतींचे जीपएसने मोजणी करावी, वनहक्क प्रदान करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना शिटप्रमाणे सातबारा द्यावा, दावेदाराचे नाव इतर कॉलममध्ये न टाकता भूमीस्वामी भोगवटदारमध्ये त्याचा समावेश करावा, एटापल्ली शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, बांडे नदीवर टँक बसवून पाईपलाईनने पाणीपुरवठा करावा, एटापल्ली येथे क्रिडांगणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, व्यायामशाळा उपलब्ध करून द्यावी, जिल्हास्तरीय वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यांवर त्वरित प्रक्रिया करून आंदोलनकर्त्यांना वनहक्क प्रदान करावे आदी मागण्यांसाठी सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी युवा समिती एटापल्लीचे संयोजक सुरेश बारसागडे, अहेरी जिल्हा निर्माण समितीचे राजू गोटा करीत आहेत.
याच मागण्यांसाठी यापूर्वीही अनेकवेळा आंदोलन करण्यात आले आहे. मात्र मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे आताचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रशासनाचीही तारंबळ उडाली आहे. मागण्यांचे निवेदन तहसीलदार संपत खलाटे यांना देण्यात आले व त्यांच्यासोबत विविध मुद्यांवर सुरेश बारसागडे व शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेदरम्यान तालुकास्तरावरील समस्या तत्काळ सोडविल्या जातील व इतर मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Tribal fasting at Etapally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.