जंगलात करंट लावून शिकार करण्याच्या प्रयत्नातील दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:42+5:302021-07-10T04:25:42+5:30
प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांच्या मार्गदर्शनाखाली भाडभिडी उपक्षेत्रातील कर्मचारी गस्ती करीत असताना जंगल परिसरात लोखंडी बारीक ...
प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांच्या मार्गदर्शनाखाली भाडभिडी उपक्षेत्रातील कर्मचारी गस्ती करीत असताना जंगल परिसरात लोखंडी बारीक तार पसरवून त्यात जिवंत विद्युत प्रवाह सोडलेला आढळला. या प्रकार श्वापदांच्या शिकारीसाठी असल्याचे लक्षात येताच परिसरात शोध घेण्यात आला. त्यात बरून अतुल मंडल (रा.नेताजीनगर) आणि तपन सतीश बिश्वास (रा.गौरीपूर) या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी ते तार पसरविले असल्याची कबुली दिली. घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत बारीक तार पसरवून ठेवलेला होता.
(बॉक्स)
कोरोनाच्या कारणामुळे न्यायालयीन कोठडी
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र त्यांची वनकोठडी घेणे अपेक्षित होते, पण कोरोनाकाळामुळे त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांनी सांगितले. ही कारवाई क्षेत्रसहायक आर. एम. नरुले, वनरक्षक एन. पी. कुळमेथे, व्ही. जी. लांजेवार, महेश कोरवते, आनंद साखरे, शरद उराडे, एन. साळुंके, अक्षय राऊत, दीपक दुधबावरे आदींनी केली.
090721\1734-img-20210709-wa0128.jpg
चामोर्शि वनपरिक्षेत्र ची दोन आरोपी विरुद्ध करण लावल्या प्रकरणी कारवाई फोटो