गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत दोघांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 09:55 AM2020-05-13T09:55:01+5:302020-05-13T09:55:17+5:30

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीत बुडून दोन जणांचा मृत्यू होण्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

The two were died in the Wainganga river in Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत दोघांना जलसमाधी

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत दोघांना जलसमाधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीत बुडून दोन जणांचा मृत्यू होण्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. प्रा.पद्माकर तानबाजी मडावी (42, रा.कोरेगाव चोप) आणि संजय मारोती उके (40, रा.कुरुड) अशी मृतांची नावे आहेत.
प्रा.मडावी हे ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालय निलज (ता.ब्रह्मपुरी) येथे कार्यरत होते. सध्या सीमाबंदीमुळे हे दोन मित्र मंगळवारी संध्याकाळी डोंग्याने वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यातील खडकाळा घाटावर पोहोचले. पण नावाड्याला आम्ही आंघोळ करतो असे सांगून ते पाण्यात उतरले. संध्याकाळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. सकाळी त्यांचे मृतदेह दिसले. त्यांची दुचाकी नदीच्या गडचिरोली जिल्हयातील तीरावर होती.

Web Title: The two were died in the Wainganga river in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू