जंगली हत्तींच्या कळपाने घेतला यूटर्न; चिखलीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:00 AM2021-12-06T05:00:00+5:302021-12-06T05:00:26+5:30
हत्तींचा कळप दिनांक ३ डिसेंबर राेजी रात्री पळसगाव महादेव पहाडी परिसरात दिसून आला. पळसगाव गावात पोहोचून गावाच्या शेवटी असलेल्या नागरिकांच्या अंगणातील केळींच्या झाडांची, तसेच घराची नासधूस केली. गावकऱ्यांनी हत्तींना पिटाळून लावले. हा कळप पाथरगोटामार्गे पुढे जाईल, असा अंदाज हाेता. मात्र, कळपाने ४ डिसेंबरला यूटर्न घेतला आहे. ते चिखली परिसरात पुन्हा दाखल झाले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : हत्तींच्या कळपाने चिखली (रीठ) या परिसरातून ३ डिसेंबर राेजी काढता पाय घेत, ते आरमाेरी तालुक्यातील पळसगाव (पाथरगोटा) या परिसरात पाेहाेचले हाेते. पुढे ते पूर्वेकडे वाढाेना परिसरात जातील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, यूटर्न घेत ते पुन्हा ४ डिसेंबर राेजी चिखली परिसरात आले आहेत.
हत्तींचा कळप दिनांक ३ डिसेंबर राेजी रात्री पळसगाव महादेव पहाडी परिसरात दिसून आला. पळसगाव गावात पोहोचून गावाच्या शेवटी असलेल्या नागरिकांच्या अंगणातील केळींच्या झाडांची, तसेच घराची नासधूस केली. गावकऱ्यांनी हत्तींना पिटाळून लावले. हा कळप पाथरगोटामार्गे पुढे जाईल, असा अंदाज हाेता. मात्र, कळपाने ४ डिसेंबरला यूटर्न घेतला आहे. ते चिखली परिसरात पुन्हा दाखल झाले आहेत.
४ डिसेंबरच्या रात्री त्यांनी चिखली गावाकडे माेर्चा वळविला. कळप गावाकडे येत असल्याचे लक्षात येताच, वनविभागाच्या पथकाने, तसेच गावकऱ्यांनी शेकाेट्या पेटवून, तसेच आरडाओरड करून गावाकडे येण्यास अटकाव केला. ते शेताच्या दिशेने निघून गेले. १ डिसेंबरच्या रात्री हत्तींनी चिखली येथील नित्यानंद बुद्धे यांच्या १५ एकरांतील धान पुंजण्याचे नुकसान केले हाेते. ४ डिसेंबरच्या रात्री पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन हत्तींनी नुकसान केले. ५ डिसेंबर राेजी हा कळप चिखली येथील फुटका तलाव परिसरात आढळून आला.
चिखलीवासीयांची हाेताहे झाेपमाेड
जंगली हत्तींचा कळप चिखली परिसरातच मागील आठ दिवसांपासून ठाण मांडून बसला आहे. गावाजवळ असलेल्या तलावात पुरेसे पाणी असल्याने हा कळप आणखी किती दिवस थांबणार हे सांगणे कठीण झाले आहे. दिवसभर तलाव परिसरात राहल्यानंतर रात्रीच्या सुमारास गावाकडे हा कळप येत असल्याने नागरिकांची झाेपमाेड हाेत आहे. कळप येऊ नये,यासाठी शेकाेट्या पेटविणे, गावातील युवकांना जागे ठेवणे, फटाके फाेडणे आदी उपक्रम केले जात आहेत. यामुळे गावातील नागरिकांची झाेपमाेड हाेत आहे. वन विभागाच्या पथकातील कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.