संविधान समाज निर्मितीचे मूल्यशास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 06:00 AM2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:33+5:30
याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिदास राऊत म्हणाले, भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ आहे. सर्वसामान्यांना संविधानाप्रति जागरूक करणे आवश्यक आहे. संविधानाची उद्देशिका ही मध्यवर्ती संकल्पना असून ही प्रतिज्ञा केवळ म्हणण्यासाठी नाही तर आपल्या जगण्याचा व वागण्याचा विषय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ असून ते सर्व कल्याणकारी समाज निर्मितीचे एक समग्र मूल्यशास्त्र आहे, असा सूर मान्यवरांनी काढला.
रामनगरातील पंचशील बौद्ध समाज मंडळाच्या वतीने सामाजिक प्रबोधन व्याख्यानमाला व संविधान अभिवादन कार्यक्रम मंगळवारी घेण्यात आला. पंचशील बुद्ध विहारात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळाचे अध्यक्ष अनिल बारसागडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत, केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, त्रिशरण महिला मंडळाच्या अध्यक्ष धारा मेश्राम, सचिव सुप्रिया मेश्राम उपस्थित होत्या.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिदास राऊत म्हणाले, भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ आहे. सर्वसामान्यांना संविधानाप्रति जागरूक करणे आवश्यक आहे. संविधानाची उद्देशिका ही मध्यवर्ती संकल्पना असून ही प्रतिज्ञा केवळ म्हणण्यासाठी नाही तर आपल्या जगण्याचा व वागण्याचा विषय आहे.
केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, अनिल बारसागडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान संविधान उद्देशिका लेखन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. या स्पर्धेत अ गटात प्रथम क्रमांक सुमेध शिंपी, द्वितीय मनस्वी बारसागडे, ब गटात प्रथम क्रमांक श्रीती गोवर्धन, द्वितीय क्रमांक प्रीती मेश्राम यांनी पटकाविला. संचालन गौतम डांगे, प्रास्ताविक महेंद्र गेडाम तर आभार राखी गोवर्धन यांनी मानले. दयाल शेंडे, लवकुश भैसारे, आशिष शेंडे, पूनम भोयर, मंगला मानकर, उषा गेडाम, तारा खोब्रागडे, वनिता मोटघरे, वनिता बांबोळे, दर्शना मेश्राम यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.