सिराेंचा तालुक्यात भाजीपाल्याचे दर वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:06 AM2021-03-13T05:06:48+5:302021-03-13T05:06:48+5:30
सिराेंचा तालुक्यात दरवर्षी भाजीपाल्याचे उत्पादन माेठ्या प्रमाणात घेतले जाते. येथील भाजीपाला बाहेरही पाठविला जाताे, परंतु मागील वर्षीच्या हंगामात परतीच्या ...
सिराेंचा तालुक्यात दरवर्षी भाजीपाल्याचे उत्पादन माेठ्या प्रमाणात घेतले जाते. येथील भाजीपाला बाहेरही पाठविला जाताे, परंतु मागील वर्षीच्या हंगामात परतीच्या पावसाचा फटका बसल्याने सध्या भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. भाजीपाल्यासह स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ झाली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दरवाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी १०० ते १५० रुपयांपर्यंत थैलीभर भाजीपाला विकत मिळायचा, परंतु आता अर्धी थैलीही भाजीपाला येत नसल्याचे दिसून येते. विविध भाजीपाल्याचा दर सरासरी ८० ते १०० रुपये प्रती किलो तर तूरडाळ व खाद्य तेल १२५ ते १४० रुपयांच्या घरात पोहाेचले आहे. भाजीपाला, डाळ व इतर किराणा वस्तूंसह खाद्य तेलाच्या किमतीचे दर आकाशाला भिडले असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट काेलमडले आहे.
मागील वर्षी बाजारात फुलकोबी ६० रुपये प्रती किलो, पत्ता कोबी ३० रुपये किलाे, वांगी ४० रुपये किलाे, भेंडी ३० रुपये प्रती किलाे, बटाटा ३० रुपये किलाे, चवळीच्या शेंगा ४० रुपये, दोडके ४० रुपये, कांदे ४० ते ५० रुपये, मिरची ४० रुपये प्रतिकिलाे दर होता. ऑक्टोबर, २०२० पासून भाजीपाला दरात वाढ झाली. सध्या फुलकोबी, चवळीच्या शेंगा, मेथीभाजी १०० रुपये प्रती किलो, वांगी, भेंडी, पत्ताकाेबी, हिरवी मिरची ६० ते ८० रुपये प्रतिकिलाे दर आहे. बटाटे ४० रुपये तर कांदे ५० ते ६० रुपये प्रतिकिलाे रुपये दराने विकले जात आहेत. सध्याच्या दरवाढीने गृहिणींना घर सांभाळताना करसत करावी लागत आहे.