आष्टी नाक्यावर आता वाहनांची तपासणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:38+5:302021-04-30T04:46:38+5:30
आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलापलीकडे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा सुरु होते. या मार्गाने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. जीवनावश्यक ...
आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलापलीकडे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा सुरु होते. या मार्गाने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. जीवनावश्यक वस्तू तसेच मेडिकलची औषधी आदींसाठी पासधारक वाहतूक करु शकतात. नागरिकांना जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर ई-पास काढणे गरजेचे आहे. विनापास कुणालाही जाऊ देण्यात येणार नाही. असे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी सांगितले. तसेच त्यांनी आष्टी चेक नाक्यावर प्रत्यक्षात येऊन पाहणी केली. गाेंडपिपरी परिसरातील अनेक नागरिक आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत हाेते. मात्र आता या ठिकाणी नाका बसविण्यात आला असल्याने या नागरिकांची चांगलीच पंचाईत हाेणार आहे. या नागरिकांना आता गाेंडपिपरी येथे जावे लागणार आहे.