गौरीपुरातील घरकूल यादी पडताळणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 05:00 AM2022-02-09T05:00:00+5:302022-02-09T05:00:47+5:30

चामाेर्शी तालुक्यातील गाैरीपूर ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते; मात्र प्रपत्र ‘ड’ या  यादीची पडताळणी करताना गावातील पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. प्रपत्र ड यादीची फेर पडताळणी करून वगळण्यात आलेल्या घरकूल लाभार्थ्यांना तातडीने घरकूल मंजूर करावे अशी मागणी गावकऱ्यांनी आ. डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे.

Verify the home school list in Gauripur | गौरीपुरातील घरकूल यादी पडताळणी करा

गौरीपुरातील घरकूल यादी पडताळणी करा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : प्रधानमंत्री आवास योजना २०२१-२२ अंतर्गत ग्रामपंचायत गौरीपूर येथील पपत्र ड यादी फेरपडताळणी करावी, तसे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी आ.डाॅ. देवराव हाेळी यांच्याकडे केली आहे. 
चामाेर्शी तालुक्यातील गाैरीपूर ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते; मात्र प्रपत्र ‘ड’ या  यादीची पडताळणी करताना गावातील पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. प्रपत्र ड यादीची फेर पडताळणी करून वगळण्यात आलेल्या घरकूल लाभार्थ्यांना तातडीने घरकूल मंजूर करावे अशी मागणी गावकऱ्यांनी आ. डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे. निवेदन देताना गौरीपूर येथील रविन साखारी, अमूल्य हलदर, संजय मंडल, पलाशी गुंडिया, संजीत हलदार, कुमारेश विश्वास, बिरेन गुंडिया यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना २०२१-२२ अंतर्गत ग्रामपंचायत गौरीपूर तालुका चामोर्शी येथील ग्रामस्थांना घरकुलाची मंजुरी देण्यात आली होती. परंतु प्रपत्र ड यादीची पडताळणी करताना गावातील काही पात्र लाभार्थींना फोर व्हीलर, टू व्हीलरधारक व  मोठे व्यावसायिक दाखवून अपात्र करण्यात आले. जे खरोखर अपात्र आहेत त्यांना पात्र करून त्यांचे घरकूल मंजूर करण्यात आले. यामुळे पात्र घरकूल धारकांवर प्रचंड अन्याय करण्यात आला आहे, असा आराेप गावकऱ्यांनी केला आहे.

 

Web Title: Verify the home school list in Gauripur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.