लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च रोजी जिल्हाभरात मतदान होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयात बुधवारी सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी अनेक गावातील गावपुढारी व कार्यकर्त्यांनी सोडतीच्या ठिकाणी गर्दी केली होती. बुधवारी तालुका प्रशासनाच्या वतीने धानोरा, सिरोंचा, देसाईगंज, कोरची, कुरखेडा व गडचिरोली या सहा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यासह निवडणुकीचे काम पाहणारे कर्मचारी तसेच राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ते व नागरिकांसाठी तालुका प्रशासनाच्या वतीने पेंडालची व्यवस्था करण्यात आली होती. काही जणांनी आरक्षण नोंदवून घेतले.गडचिरोली तालुक्यात विविध प्रवर्गांना मिळणार प्रतिनिधित्वगडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी तहसील कार्यालयालगत असलेल्या गोंडवाना कला दालनात काढण्यात आली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली आरक्षण सोडत जवळपास दोन तास चालली. यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोडतीला पं.स. सभापती मारोतराव इचोडकर यांच्यासह तालुक्यातील अनेक लोक उपस्थित होते. त्यानुसार नामाप्रसाठी पोर्ला, विहिरगाव, भिकारमौशी, धुंडेशिवणी येथील पद आरक्षित झाले. नामाप्र स्त्रीसाठी नगरी, नवरगाव, येवली, चुरचुरा माल, साखरा, तसेच सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी गोगाव, टेंभा, दर्शनी माल, दिभना माल, वाकडी, राजगाटा चक, अमिर्झा, पारडी कुपी, जेप्रा या ग्रा.पं.चे सरपंच पद आरक्षित झाले. सर्वसाधारणसाठी कोटगल, चांभार्डा, इंदाळा, अडपल्ली, गुरवळा, हिरापूर, शिवणी, काटली, डोंगरगाव, बोदली आदी ठिकाणचे पद आरक्षित झाले. अनुसूचित जातीसाठी वसा, आंबेशिवणी, मुरखळा या ग्रा.पं.चे सरपंच पद आरक्षित झाले. अनुसूचित जमाती महिलेसाठी मौशीखांब, पोटेगाव, मरेगाव, चांदाळा, पुलखल, खुर्सा, सावरगाव, सावेला, देवापूर, राजोली आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. अनुसूचित जाती महिलेसाठी बामणी, खरपुंडी ग्रा.पं.चे सरपंच पद आरक्षित आहे. अनुसूचित जमातीसाठी मारोडा, जमगाव, मुरमाडी, कनेरी, गिलगाव, मुडझा, मारदा आदी ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.धानोरा तालुक्यातील सर्वच सरपंचपद ‘एसटी’ प्रवर्गासाठी राखीवधानोरा : धानोरा तालुक्यात ६१ ग्रामपंचायती असून त्या सर्व ठिकाणच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी काढण्यात आले. ५० टक्के जागा म्हणजे, एकूण ३१ जागांवर सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. सदर जागांची निश्चिती चिठ्ठ्या टाकून करण्यात आली. सन २०१५ मध्ये अनुसूचित क्षेत्रातील ज्या ३० ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद महिलांसाठी राखीव होते त्या सोडून इतर ग्रामपंचायती अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आल्या. त्यात सावंगा बुज, कामतळा, मुंगनेर, मिचगाव, झाडा, जप्पी, चिचोडा, फुलबोडी, कुथेगाव, रांगी, नवरगाव, दुधमाळा, निमनवाडा, कन्हाळगाव, चिंगली, तुकूम, हेटी, सोडे, सालेभट्टी, मुस्का, जांगदा बुज, सुरसुंडी, पन्नेमारा, इरूपटोला, खांबाळा, देवसरा, खामतळा, दराची, हिरंगे, कटेझरी, कुलभट्टी, सावरगाव या ३१ ग्रामपंचायतींमध्ये आता महिला सरपंच राहणार आहेत.अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ३० ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले. यामध्ये मुरगाव, मोहगाव, पेंढरी, लेखा, साखेरा, गोडलवाही, चव्हेला, मुज्यालगोंदी, दुर्गापूर, निमगाव, गट्टा, कारवाफा, मेंढाटोला, खुटगाव, मुरूमगाव, चिचोली, चातगाव, पुसटोला, रेखाटोला, येरकड, चुडीयाल, पयडी, गिरोला, देवसूर, जांभळी, मोहली, कामनगड, कोंदावाही, मिचगाव बुज, झाडापापडा आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.धानोरा तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण पंचायत समितीच्या कार्यालयात काढण्यात आले. यावेळी प्रभारी तहसीलदार महेंद्र गणवीर, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, पं.स. सभापती अनुसया कोरेटी, उपसभापती विलास गावडे, जि.प. सदस्य लता पुंघाटे, पं.स. सदस्य महागु वाटगुरे, अजमन राऊत यांच्यासह तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंचपदाचे गावनिहाय आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 6:00 AM
गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी तहसील कार्यालयालगत असलेल्या गोंडवाना कला दालनात काढण्यात आली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली आरक्षण सोडत जवळपास दोन तास चालली. यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोडतीला पं.स. सभापती मारोतराव इचोडकर यांच्यासह तालुक्यातील अनेक लोक उपस्थित होते.
ठळक मुद्देतालुकास्थळी सोडत : इच्छुक उमेदवारांसह नागरिकांमध्ये उत्साह, ५० टक्के जागांवर महिलाराज