लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीसपासून बऱ्यापैकी थंडी पडत असल्याने नागरिकांचे आरोग्य चांगले राहते. मात्र यावर्षी थंडीचे प्रमाण कमी असून अवकाळी पाऊस बरसत आहे. शिवाय ढगाळी वातावरण गेल्या चार दिवसांपासून कायम आहे. एकूणच वातावरणाच्या या बदलामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयात आबालवृद्धांसह साºयाच वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे.१०० खाटांची क्षमता असलेल्या महिला व बाल रुग्णालयात वर्षभर २५० पेक्षा गरोदर माता, प्रसूत झालेल्या माता, नवजात बालके भरती राहतात. क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या अधिक असल्याने इतर कामांसाठी बांधण्यात आलेले इमारतीचे हॉल वॉर्ड म्हणून उपयोगात आणले जात आहेत.गुंतागुंतीची प्रसूती, रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांना उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातून जिल्हास्तरावरील महिला व बाल रुग्णालयात रेफर केले जाते. जिल्ह्याबरोबच नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सावली, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी तालुक्यांसह छत्तीसगड राज्यातीलही काही महिला प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालयात भरती होतात. त्यामुळे सदर रुग्णालय नेहमीच फुल्ल राहते. महिला व बाल रुग्णांसाठी १०० खाटांची क्षमता असलेले स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र हे रुग्णालय सुद्धा आता अपुरे ठरत आहे. दर दिवशी जिल्हाभरातून ६० ते ७० महिला प्रसूतीसाठी व १० ते २० बालके उपचारासाठी भरती होतात. प्रसूत झालेल्या महिलेला तिच्या प्रकृतीप्रमाणे काही दिवस भरती ठेवावे लागते.येथील बालकांच्या वॉर्डामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातही अनेक रुग्ण भरती असल्याचे दिसून येते. सायंकाळच्या सुमारास गडचिरोली येथील विविध खासगी रुग्णालयात लहान बालके, शालेय मुले, मुली तसेच महिला व प्रौढ नागरिक औषधोपचारासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येते. एकूणच रुग्णांची संख्या वाढली आहे.अपुºया कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढलामहिला व बाल रुग्णालयात महिला व बाल रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र येथे पुरेसे मनुष्यबळ नाही. या रुग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत वर्ग-४ ची २४ व वर्ग-३ ची ५ पदे भरायची होती. मात्र यापैकी एकही पद भरण्यात आले नाही. रोजंदारी कर्मचाऱ्यांवर सेवा चालविली जात आहे. या ठिकाणी परिचारिकांची २० पदे मंजूर आहेत. मात्र रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर एवढ्या परिचारिका एकाच शिफ्टसाठी आवश्यक आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे तर प्रशासकीय अधिकाºयाचेही एक पद रिक्त आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, त्यातच रुग्णांची संख्या क्षमतेपेक्षा अडीचपट अधिक आहे. त्यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे.
व्हायरल फीव्हरने रुग्णालये फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 5:00 AM
यावर्षी थंडीचे प्रमाण कमी असून अवकाळी पाऊस बरसत आहे. शिवाय ढगाळी वातावरण गेल्या चार दिवसांपासून कायम आहे. एकूणच वातावरणाच्या या बदलामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयात आबालवृद्धांसह साºयाच वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे.
ठळक मुद्देसर्दी व डोकेदुखीचा त्रास वाढला : अवकाळी पाऊस व ढगाळी वातावरणाचा परिणाम