व्हिडीओ व जिंगल्सद्वारे मतदार जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:00 AM2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:27+5:30
प्रशासनामार्फत दोन चित्ररथ तयार केले आहे. या दोन्ही चित्ररथांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ, तहसीलदार एन.एम.ठाकरे, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, आशिष सोरते, राजू भुरसे, विवेक दुधबळे, दीपक लाकूडवाहे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनामार्फत अनेक उपाय केले जात आहेत. निवडणूक विभागाने आता मतदार जागृतीसाठी स्वतंत्र चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथात एलसीडी टीव्ही, साऊंड सिस्टीम राहणार आहे. व्हिडीओ व जिंगल्सच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
प्रशासनामार्फत दोन चित्ररथ तयार केले आहे. या दोन्ही चित्ररथांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ, तहसीलदार एन.एम.ठाकरे, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, आशिष सोरते, राजू भुरसे, विवेक दुधबळे, दीपक लाकूडवाहे आदी उपस्थित होते. चित्ररथाच्या दोन्ही बाजूला आकर्षक बॅनर लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून मतदार, मतदान, ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत संदेश दिला जाणार आहे.
सिनेतारिका माधुरी दीक्षित यांची मतदारांना आवाहन असलेली जाहिरात, जिल्हाधिकारी यांचे मतदारांना आवाहन, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनबद्दल माहिती फिल्म शोद्वारे दाखविली जाणार आहे.
शासकीय पत्रांवर मतदान जागृतीचे शिक्के
शासकीय कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार केला जातो. मतदानाची जागृती कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा व्हावी, प्रत्येक शासकीय पत्रावर मतदानाचा दिनांक व वेळ असलेला शिक्का मारला जाणार आहे. नागरिकांना पाठविल्या जाणाºया पत्रांवरही सदर शिक्के राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्येक विभागाला अशा प्रकारचे शिक्के पुरविण्यात आले आहेत. यातूनही जनजागृतीचा प्रयत्न होत आहे.