राेहयाे कामाची मजुरी प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:35 AM2021-05-16T04:35:54+5:302021-05-16T04:35:54+5:30
अजून किती दिवस वाट बघायची आणि काय खायचे असाही प्रश्न मजुरांना भेडसावत आहे. रोजगार हमी योजनेअंर्तगत १५ दिवसांत मजुरीची ...
अजून किती दिवस वाट बघायची आणि काय खायचे असाही प्रश्न मजुरांना भेडसावत आहे. रोजगार हमी योजनेअंर्तगत १५ दिवसांत मजुरीची रक्कम जमा करण्याची हमी दिली जाते. मात्र, दोन महिने उलटूनही कामाचे पैसे जमा न झाल्याने ते मिळणार की नाही, असाही प्रश्न मजुरांना सतावत आहे. एकीकडे कामे बंद, तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीपोटी बाहेर पडून कामावर जाण्याची हिंमत होत नाही, तर घरी राहून खायचं तरी काय, उपाशीपोटी जगणाऱ्या मजुरांची रक्कम कधी जमा होणार, याकडे लक्ष लागले आहे. उदरनिर्वाह करायचं म्हटलं की पैसा लागतो आणि केलेल्या कामाच्या मजुरीचे पैसे मिळत नसतील तर मजूर कुणाकडून आशा बाळगणार, असा प्रश्न आहे. एकीकडे कोरोना असल्याने रोजगार हमीची कामे बंद केली गेली आणि दुसरीकडे केलेल्या कामाचा माेबदला मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मजुरांची मजुरी जमा करावी अशी मागणी मजूर वर्ग करीत आहे.