पिंपळगावला एसटी बसची प्रतीक्षा

By admin | Published: May 19, 2014 11:30 PM2014-05-19T23:30:08+5:302014-05-19T23:30:08+5:30

देसाईगंज कुरखेडा मार्गावर असलेल्या शंकरपूरवरून दक्षिणेला जाणार्‍या आरमोरी मार्गावरील विठ्ठलगाव - पोटगाव या दोन गावादरम्यान असलेल्या फाट्यावरुन पूर्वदिशेला

Waiting for Pimpalgaon ST bus | पिंपळगावला एसटी बसची प्रतीक्षा

पिंपळगावला एसटी बसची प्रतीक्षा

Next

विसोरा : देसाईगंज कुरखेडा मार्गावर असलेल्या शंकरपूरवरून दक्षिणेला जाणार्‍या आरमोरी मार्गावरील विठ्ठलगाव - पोटगाव या दोन गावादरम्यान असलेल्या फाट्यावरुन पूर्वदिशेला ३ किमी अंतरावर जंगलाच्या कुशीत पिंपळगाव हे १२०० लोकवस्तीच्या गावाला ६७ वर्षापासून एसटीची प्रतीक्षा आहे. पिंपळगावला स्वतंत्र ग्रामपंचायत असून २००८-०९ सालचा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा राज्यस्तरावरील विशेष पुरस्कार प्राप्त झालेला आहे़ आजही पिंपळगावच्या लोकांना मात्र बाहेरगावी पायदळ, सायकल, मोटारसायकलने जावे लागते. एस़ टी़ बस तर सोडा खासगी वाहनसुध्दा गावात येत नाही. त्यामुळे येथील जनतेला अतिशय त्रास सहन करावा लागत आहे़ शेती हा पिंपळगाव येथील लोकांचा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी शेतीस लागणारे सर्व साहित्य वडसा, ब्रह्मपुरी, आरमोरी वरुन खरेदी करतात तसेच दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विहिरगाव सोडल्यास वडसा, ब्रह्मपुरी, आरमोरी येथे जावे लागते़ यासाठी पिंपळगाववरुन सायकलने ७ किमी अंतरावरील शंकरपूरला जाऊन तिथून पुन्हा एस़ टी़ बसने वडसा, ब्रह्मपुरी, आरमोरी येथे जावे लागते़ त्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवाशांचे बेहाल होतात. वाहनांची सोय नसल्याने शंकरपूर, विठ्ठलगाव, पोटगाववरुन जंगली वाट तुडवत वन्यप्राण्यांच्या दहशतीत जीव मुठीत घेऊन पिंपळगावला जावे लागते. आजघडीला ब्रह्मपुरी-वडसा-शंकरपूर-विठ्ठलगाव-पोटगाव-जोगीसाखरा-आरमोरी या मार्गावर बस धावते, परंतु ही बस पिंपळगावला जात नाही़ या बसची वेळही सकाळी १० ते दुपारी १ वाजताची असल्याने ही वेळ विद्यार्थ्यांना परवडत नाही, तर इतरांनाही या बसने ये-जा करण्यासाठी ३ किमी अंतरावरील विठ्ठलगाव, पोटगावला यावे लागते. या वेळेत बस मिळाली नाही तर शंकरपुरला आल्याशिवाय पर्याय नाही. पिंपळगावसाठी बस सुरू करावी, अशी मागणी पिंपळगाववासीयांसह परिसरातील नागरिक करीत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Waiting for Pimpalgaon ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.