गडचिराेली : हवामानाची पूर्वसूचना देणारे ‘माैसम’ हे माेबाईल ॲप आयएमडीने (इंडिया मेटिओरोलॉजिकल डिपार्टमेंट) तयार केले आहे. या ॲपमुळे हवामानाची पूर्वकल्पना मिळण्यास मदत हाेत असल्याने वेळीच सावधगिरी बाळगणे नागरिकांना शक्य हाेते. वीज पडण्याच्या घटनांपासून शेतकरी व इतर नागरिकांचा बचाव हाेण्यास मदत हाेते.
माैसम ॲप कसे डाऊनलाेड करणार
गुगल प्ले स्टाेअरवर माैसम ॲप उपलब्ध आहे. भारताची राजमुद्रा असलेले व भारत माैसम विभाग असे लिहिले आहे. हे ॲप डाऊनलाेड करावे.
या ॲपवर काय माहिती मिळणार
ॲप उघडताच हवामानाची सूचना देणारा संदेश येताे. तसेच किमान व कमाल तापमान, सूर्याेदय, सूर्यास्त, चंद्राेदय, चंद्रास्त यांची वेळ दिसते.
मराठीतही माहिती उपलब्ध
- या ॲपवर १३ भाषांमध्ये माहिती उपलब्ध आहे. त्यात मराठी भाषेचाही समावेश आहे. ज्या भाषेची निवड कराल त्या भाषेत संदेश प्राप्त हाेतात.
- सर्वप्रथम ॲप इंग्रजी भाषेतच सुरू हाेताे. वर असलेल्या तीन रेषांवर क्लिक करून भाषेची निवड करावी.
शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचे
हवामानाची पूर्वसूचना हे ॲप देत असल्याने शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचे आहे. एखाद दिवशी अवकाळी पाऊस येणार असेल तर ताे पिकांचे संरक्षण करेल. तसेच वादळ, वारा, विजा चमकणार असतील तर ताे घराबाहेर पडणार नाही.