चामोर्शीत टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:11 PM2019-05-09T22:11:59+5:302019-05-09T22:12:22+5:30

चामोर्शी नगर पंचायतीतर्फे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र प्रभाग क्र.५ मधील लालडोंगरी भागात नगर पंचायतीची नळपाईपलाईन अद्यापही पोहोचली नाही. परिणामी या भागातील विहीर व हातपंपाने तळ गाठल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

Water supply through Charmoset tanker | चामोर्शीत टँकरद्वारे पाणीपुरवठा

चामोर्शीत टँकरद्वारे पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देलालडोंगरी प्रभागात पाणीटंचाई : नगर पंचायत प्रशासनाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीतर्फे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र प्रभाग क्र.५ मधील लालडोंगरी भागात नगर पंचायतीची नळपाईपलाईन अद्यापही पोहोचली नाही. परिणामी या भागातील विहीर व हातपंपाने तळ गाठल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरातील प्रभाग क्र.५ मधील लालडोंगरी वसाहतीचा समावेश नगर पंचायतीत करण्यात आला. या वस्तीत एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. चामोर्शी शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या लालडोंगरी वस्ती ही चढभागावर आहे. पाण्याची गरज लक्षात घेऊन या प्रभागात पुरेसे हातपंप बसविण्यात आले. मात्र वाढत्या तापमानामुळे हातपंपाची पाणीपातळी खालावल्याने येथे अनेक कुटुंबांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन येथे नगर पंचायतर्फे पाण्याचा टँकर नियमितपणे पाठविला जात आहे.
नगर पंचायतीच्या मालकीचा एक व दुसरा टँकर भाडेतत्त्वावर घेऊन प्रशासनाच्या वतीने दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नगर पंचायत कार्यालय परिसरात असलेल्या टाकीतून तसेच मार्कंडा रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रातून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. त्यानंतर हे टँकर लालडोंगरी वस्तीत पाठविली जात आहे. या प्रभागाचे नगरसेवक प्रमोद वायलालवार हे काही दिवसांपूर्वी सदर भागात जाऊन समस्यांबाबत पाहणी केली. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाईची समस्या त्यांच्यापुढे मांडली. याची दखल घेत त्यांच्या पुढाकाराने टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
अनेक भागात अत्यल्प पाणीपुरवठा
नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने चामोर्शी शहराच्या १७ वॉर्डात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र शहरातील हनुमाननगर, मूल, आष्टÑी मार्गावरील वस्तीचा भाग हा चढ भाग आहे. त्यामुळे या भागात नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. काही नवीन वस्त्यांमध्येही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
 

Web Title: Water supply through Charmoset tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.