पाेर्लाचे ३३ केव्ही वीज उपकेंद्र ठरताहे पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:39 AM2021-05-27T04:39:18+5:302021-05-27T04:39:18+5:30

गडचिराेली : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या पाेर्ला येथे काेट्यवधी रुपये खर्च करून ३३ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यात ...

The white elephant is the 33 KV substation of Parla | पाेर्लाचे ३३ केव्ही वीज उपकेंद्र ठरताहे पांढरा हत्ती

पाेर्लाचे ३३ केव्ही वीज उपकेंद्र ठरताहे पांढरा हत्ती

Next

गडचिराेली : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या पाेर्ला येथे काेट्यवधी रुपये खर्च करून ३३ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यात आले. हे उपकेंद्र सुरू हाेऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या उपकेंद्रातून ग्राहकांना याेग्य वीज पुरवठ्याची सेवा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

हलक्याशा वादळाने येथील पुरवठा खंडित हाेत आहे. सध्या उकाड्याचे दिवस सुरू असल्याने नागरिकांना कुलर व पंखे आदी उपकरणाची गरज भासते. मात्र वीज पुरवठा खंडित हाेत असल्याने नागरिकांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पाेर्ला परिसरात सदर वीज उपकेंद्रातून बऱ्याचदा कमी दाबाचा वीज पुरवठा हाेत असल्याने वीज उपकरणे निकामी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील वीज समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The white elephant is the 33 KV substation of Parla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.