गडचिरोली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वत्र जाहीर होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काट्याची टक्कर समजली जात होती पण महायुतीच्या तिहेरी अंकांच्या आघाडीने महाराष्ट्राचा निकाल राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला २२० पेक्षा अधिक जागांवर आघाडी दिसत आहेत.
विदर्भाच्या काही लढती सुरवातीपासूनच चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यातील गडचिरोली येथील अहेरी मतदार संघातील बाप लेकीमधील लढाईमुळे सर्वत्र महाराष्ट्राचे लक्ष अहेरीच्या निकालाकडे आहेत. पहिल्या फेरीनंतर २२०० मतांनी आघाडीवर असलेले धर्मराव बाबा आत्राम यांनी पाचव्या फेरीअखेर २९९३ मतांची आघाडी कायम ठेवली आहे. १०२१७ मतांनी अंब्रीशराव आत्राम दुसऱ्या क्रमांकावर येतात तर धर्मरावबाब यांच्या कन्या वडिलांच्या विरोधात टिकू शकल्या नाहीत असं चित्र त्यांना मिळालेल्या ६८९० मतांनी स्पष्ट होते.