लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम, नक्षलग्रस्त भागात प्रत्येक नागरिकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामांची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी मुलभूत सुविधांची गुणवत्ता व संख्या योग्य प्रकारे राबविण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म)मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.१) येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार अशीर्वाद, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवाराव होळी, जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी उपस्थित होते.स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, आर्थिक चलन वाढावे याकरिता विविध कामे, योजना, प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन खंबीरपणे जिल्ह्याच्या पाठीमागे आहे, असे पालकमंत्री म्हणाले. वीज, रस्ते, पूल, पिण्याचे पाणी व चांगली आरोग्य सुविधा यामधील प्रत्येक घटकांची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाल्यास स्थानिक नागरिक विकासाच्या दिशेने वाटचाल करतील. यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करा, त्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी या बैठकीत उपस्थितांना दिली.विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या कंत्राटदार किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आवश्यकता असल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.वनविभागातील नियमांचा बागुलबुवा बाजूला ठेवून विकास कामे तत्काळ मार्गी लावा, असे निर्देश त्यांनी दिले. विविध रखडलेल्या कामांबाबत पालकमंत्र्यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी वनविभागाकडून प्रलंबित मंजुर असलेल्या विविध कामांबाबत चर्चा केली व वनविभागातील संबंधित अधिकाºयांना आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती केली.निधी कमी पडणार नाहीदुर्गम भागातील महत्वाच्या आणि मूलभूत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मंजूर कामे तातडीने पूर्ण करा व आवश्यक कामांसाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. यावेळी वडसा ते गडचिरोलीदरम्यान होणाºया रेल्वे मार्गाबाबतच्या कामांवर चर्चा करण्यात आली. आवश्यक बदलांसह कामे पुढे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री तसेच राज्यस्तरावर कॅबिनेट पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. वन विभागाला त्याबाबत आवश्यक सूचना केल्या.गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील इयत्ता दहावीत चांगले गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.मुंबईत असलो तरी जिल्ह्यावर विशेष लक्षगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत दैनंदिन स्वरूपात जिल्हाधिकारी व इतर अधिकाºयांशी मी दररोज वार्तालाप करत आहे. मुंबई येथे मंत्रालयात असूनही गडचिरोली जिल्ह्यावर माझे विशेष लक्ष असून येत्या काळात जिल्ह्यात रोजगार व विकास कामांबाबत बदल घडवून आणला जाईल, असे ना.शिंदे म्हणाले.
दुर्गम भागाचा विकास करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 5:00 AM
स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, आर्थिक चलन वाढावे याकरिता विविध कामे, योजना, प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन खंबीरपणे जिल्ह्याच्या पाठीमागे आहे, असे पालकमंत्री म्हणाले. वीज, रस्ते, पूल, पिण्याचे पाणी व चांगली आरोग्य सुविधा यामधील प्रत्येक घटकांची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाल्यास स्थानिक नागरिक विकासाच्या दिशेने वाटचाल करतील.
ठळक मुद्देपालकमंत्री शिंदे । नव्याने पदभार घेतल्यानंतर जिल्हास्तरीय आढावा बैठक