लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जागतिक योग दिन गुरूवारी जिल्हाभर साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग व प्राणायामचे महत्त्व पटवून देण्यात आले.जिल्हा पोलीस मुख्यालय, गडचिरोली - जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पोलीस दलाच्या वतीने गुरूवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर योग अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिकारी व शेकडो जवानांनी योगासनाचे धडे गिरविले. योग प्रशिक्षक संजय देशमुख, वर्षा देशमुख व अथर्व गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योगासनांचा अभ्यास केला. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, हरी बालाजी, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे उपस्थित होते. या अभ्यासात पोलीस दलातील २० अधिकारी व ४५० जवान आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन योगासनाचे धडे गिरविले.शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे होते. डॉ. चिकटे यांनी शिक्षक व कर्मचाºयांना निरोगी राहण्याकरिता योग व प्राणायामासह आसने करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी प्रा.डॉ.एम.टी.नक्षिणे, प्रा.डॉ.आर.एस.गोरे यांनी कपालभारती अनुलोम-विलोम, बटरफ्लॉय, मंडूकासन, ताडासन, त्रियकताडासन, कटिचकासन, त्रिकोणासन, सर्वांगासन, सूर्यनमस्कार आदींचा सराव करून घेतला. संचालन डॉ. नक्षिणे तर आभार डॉ. गोरे यांनी मानले. यावेळी अॅड.एस.एन.गंगुवार, शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य नंदेश्वर व कर्मचारी उपस्थित होते.जि.प.उच्च प्राथमिक शाळा, चिंगली - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्लो, मुख्याध्यापक व्ही.व्ही. मस्के, भावेश उईके, मलिया उपस्थित होते. भावेश उईके यांनी प्रात्यक्षिकासह योगाची माहिती दिली.आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय, देसाईगंज - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. उद्घाटन न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ.एच.एम.कामडी, बाळबुद्धे, सीआरपीएफ १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, पतंजली योग समितीचे कार्यवाह गरफडे, वैद्य, अॅड.विजय ढोरे उपस्थित होते. गरफडे यांनी योग व प्राणायामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.राजू चावके व कर्मचाºयांनी सहकार्य केले.उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. पतंजली योग समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला तालुका प्रभारी राजश्री राऊत, मनीषा दुधे, डॉ.चिखराम, डॉ.शेख, वसुदा कोपुलवार, सिंधू कोरडे, वंदना ठवकर, ज्योती घोडमारे, ज्योती खेवले, आशा वरघंटे, सुरेखा देविकर, नीता हेमके, अंजली रोडगे, राणी वरघंटे, रूपा उके, सोनाली बोरकर, राणी उके उपस्थित होत्या. मनीषा दुधे यांनी प्रात्यक्षिकासह योग व प्राणायामाची माहिती दिली.राजश्री स्कॉलर अॅकॅडमी, नवेगाव, गडचिरोली - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग प्रशिक्षिका नलिनी बोरकर, मुख्याध्यापिका रंजना चांदेकर उपस्थित होत्या. नलिनी बोरकर यांनी प्राणायाम, ताडासन, अनुलोम-विलोम, कपालभाती, त्रिकोणासन यासह विविध आसने करून दाखविली. यावेळी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.मातोश्री विद्यालय, पिसेवडधा - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका एल.एन. दिवटे, योग शिक्षक एन.जी.करानकर, श्यामकुडे, उसेंडी, देशपांडे, राऊत, दिवटे, दाने, सहारे, विद्यार्थी उपस्थित होते.उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला योग वेदांत समितीचे अध्यक्ष पूनाजी भाकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कोमटी दुर्वा, डॉ.जगदीश बोरकर, डॉ.जगदीश राऊत, डॉ.नितीन जनबंधू, हेमंत बोरकर, डोमाने, प्रियंका उईके, कल्पना भट्ट, दीक्षा जोगे व कर्मचारी उपस्थित होते. भाकरे यांनी जीवनातील सुदृढ आरोग्यासाठी योग हाच मार्ग असून सर्वांनी योगाचा मार्ग निवडावा, असे आवाहन केले.कैै.हिरामनजी पांडव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, येंगलखेडा - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक आर.डी.बावनथडे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे महत्त्व पटवून देण्यात आले.जि.प. उच्च प्राथमिक शाळा, नांदळी - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन चौधरी, इंद्रकुमार मडावी, मुख्याध्यापक हेमराज सुखारे, नरेश रामटेके, वर्षा डोर्लीकर, गुलाब मने, दिलीप नाकाडे उपस्थित होते. याप्रसंगी योग व प्राणायामाचे प्रकार सांगून प्रात्यक्षिकासह सराव घेण्यात आला.जि.प. उच्च प्राथमिक शाळा, नगरी - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक घुगरे, मडावी, आत्राम, दंडवते, डोनेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेंद्र बारसागडे व पालक उपस्थित होते. याप्रसंगी योगासने, प्राणायाम करून मुलांना खाऊचे वितरण करण्यात आले.बीएसएनएल कार्यालय, गडचिरोली - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रबंधक एम.ए.जीवने, योग प्रसारिका अर्चना चुधरी, नीता पतरंगे उपस्थित होते. याप्रसंगी योग व प्राणायामाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला बीएसएनएल कार्यालयातील कर्मचारी कुटुंबासह उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दीपाली सिसोदे, मंजूषा श्रीरामे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.पतंजली योग समिती, अहेरी - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. एस.बी. महाविद्यालयात पार पडलेल्या शिबिरात योग व प्राणायामचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.लिसीट हायस्कूल, ठाणेगाव - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शारीरिक शिक्षक ई.एस.ठेंगरे यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका साळवे, खोब्रागडे, मानकर, कांबळे, शिक्षकेत्तर कर्मचारी आर.एम.गेडेकर, अनिल दुमाने, एस.व्ही.ठवरे, टी.डी.कोसे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.स्वा.सावरकर हायस्कूल, वडेगाव - येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक व्ही.एस.लोथे, क्रीडा शिक्षका ए.बी.राऊत, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान योग प्राणायामचा सराव करण्यात आला. यशस्वीतेसाठी कर्मचाºयांनी सहकार्य केले.
जागतिक योग दिनी जिल्हा योगमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:30 AM
जागतिक योग दिन गुरूवारी जिल्हाभर साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग व प्राणायामचे महत्त्व पटवून देण्यात आले.
ठळक मुद्देप्रात्यक्षिकासह सादरीकरण : शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये व सामाजिक संघटनांतर्फे शिबिर