रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:33 AM2021-07-26T04:33:47+5:302021-07-26T04:33:47+5:30

आरमोरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, न्यायावर ...

The youth should come forward to create a state of ryots | रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे यावे

रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे यावे

Next

आरमोरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, न्यायावर आधारित भारत निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे प्रतिपादन आरमोरी तालुक्यातील देऊळगाव, वासाळा, वैरागड व सिर्सी येथे आयोजित शिवसंपर्क अभियानादरम्यान शिवसेनेचे आरमाेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले.

कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर मने, युवासेनेचे माजी जिल्हाध्यक्ष चंदू बेहेरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, नगरसेवक माणिक भोयर, कावडु सहारे, भूषण सातव, पुंजीराम मेश्राम, लहानु पिलारे, पांडुरंग बावनकर, विलास गोंधोळे आदी उपस्थित होते.

शिवसेना हा तळागाळातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेला न्याय मिळवून देणारा पक्ष असून जनतेच्या न्याय हक्कासाठी रात्रीचा दिवस करून राबणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावागावात शाखा निर्माण करून घराघरात शिवसैनिक निर्माण करावे व शिवसेना मजबूत करावी, असे आवाहन चंदेल यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैरागड येथील रूचित बोधनकर, कवीश्वर खोब्रागडे बादल गिरीपुंजे सचिन लांजीकर, वैष्णव लांजेवार रामदास डोंगरवार मंगेश सरकार हीतेश कुळसंगे, अंकित बोधनकर, समीर तागडे व शिवशाही ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केले। तशेच सिर्सी परिसरातील काशीनाथ बोबाटे गुरुजी, सुरेशजी फुकटे, नवघडे, रमेश मुरमुरवार, किशोर बोटगीलवर, दिवाकर रोहनकार, अरुण दुमाणे, भष्कर मेश्राम, जयंत फुलबांधे, सागर नावघडे कार्यक्रमाला उपस्थित होते.

250721\img-20210724-wa0030.jpg

शिवसंपर्क अभियानात उपस्थित कार्यकर्ते

Web Title: The youth should come forward to create a state of ryots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.