ठाणे : तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो... मुख्यमंत्र्याच्या या आवाहनाला ठाण्यात मनसे प्रतिसाद देण्यात आला. चौकाचौकात काढण्यात आलेल्या कॅलिग्राफीतुन मुख्यमंत्र्यांचा संदेश देऊन मनसेने शनिवारी प्रबोधन केले. ठाण्यात मनसेचे महेश कदम यांच्यातर्फे नागरिकांना अशा अनोख्या पद्धतीने प्रबोधन करण्यात आले.
लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही नागरिकांमध्ये या आजाराचे गांभीर्य नाही. लोक सर्रासपणे फिरतात. लाठ्या काठ्या खाऊनही लोक शहरात फिरताना दिसत आहेत. भाजी घायला गेल्यावरही काही वेळ लोक इकडे तिकडे टाईमपास करताना दिसतात. पोलीस यंत्रणा 24 तास राबत आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांमध्ये या परिस्थितीचे जराही गांभार्य नाही. लोकांच्या या वागणुकीमुळे पोलीस यंत्रणेवरही ताण येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री वारंवार लोकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करूनही या आवाहनाकडे काही जण दुर्लक्ष करून आम्हाला काही होत नाही या आविर्भावात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अशा लोकांना एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी दिला आहे. शनिवारी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. यात त्यांनी तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो असे आवाहन केले याआधीही त्यांनी अनेकदा लोकांना सूचना केल्या आहेत परंत्तू त्यांचे पालन होत नाही असे कदम यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी केलेल्या हा आवाहन संदेशाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक चौकात कॅलिग्राफीतुन काढण्यात आले आहे. मंदार जगताप आणि त्यांचे दीपक साळुंखे यांनी हि कॅलिग्राफी केली आहे. लोकांना घरी बाहेर न फिरता घरीच बसावे यासाठी पोलिसांकडून विविध युक्त्या लढविण्यात आल्या. आता मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यांनतर मनसेने नवीन शक्कल लढवली आणि थेट रस्त्यावरच संदेश लिहून घरी बसण्याचे आवाहन केले. कोरोनाला लढविण्यासाठी राज्य सरकार अटीशर्तींचे प्रयत्न करीत आहे त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, कोरोना या गंभीर आजारावर मात करण्यासाठी आपण सर्वानी घरीच राहावे असे कदम यांनी सांगितले.