पर्यावरण संवर्धनासाठी विश्वभ्रमंती करणारे तिन ध्येयवेडे सिंधुदुर्गात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:27 PM2017-07-27T14:27:26+5:302017-07-27T14:35:26+5:30
सिंधुदुर्गनगरी दि. २७ : तब्बल ३७ वषार्पूर्वी पर्यावरण संवर्धनाचे व्रत घेऊन घराबाहेर पडलेले तीन ध्येयवेडे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. भारतासह ११ देशांत साडेतीन लाख किलोमीटरची पायपीट करीत या ध्येयवेड्यांनी साडेनऊ कोटी वृक्षांची लागवड केली आहे. अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप अशी या ध्येवेड्यांची नावे आहेत.
सिंधुदुर्गामध्ये शुक्रवार दि. २८ जुलै २0१७ रोजी जिल्हा परिषद आवारात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील काही शाळांना भेटी देवून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पर्यावरणाचे महत्व आणि त्याबाबतची माहिती विशद करण्यासाठी उपप्रादेशिक परीवहन, वनअधिकारी आणि काही नगर परीषदांना भेटी देणार आहे.
या मोहिमेची सुरुवात अवध बिहारी लाल यांनी १९८0 मध्ये केली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संरक्षणाची देशाला हाक दिली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत अवध बिहारी लाल पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सरसावले.
तेव्हापासून त्यांनी वृक्ष लागवडीची मोहीमच हाती घेतली. पहिली पंधरा वर्षे ते एकटेच देशभर पायपीट करीत होते. १९९५ पासून त्यांच्या या मोहिमेत तरुण, तरुणी सहभागी होऊ लागले. काहींनी मध्यावरच मोहिम सोडली, तर काहीजण या मोहिमेचे अविभाज्य अंगच बनून गेले. सध्या २0 जणांचा चमू लाल यांच्यासोबतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भ्रमंती करीत आहे. त्यात चार मुलींचाही समावेश आहे.
आतापर्यंत त्यांनी अकरा देशात साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच साडेनऊ कोटी वृक्षांची लागवडही केली आहे. लिम्का, गिनिज व इंडिया स्टार बुक आॅफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. असे अवध बिहारीलाल यांनी अशी माहिती दिली आहे.
ही पर्यावरण भ्रमंती करणाºया चमूने गुरुवारी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरसिंह आदि वरीष्ठ अधिकाºयांची भेट घेतली व आपल्या या पर्यावरण विषयक भ्रमंतीबाबतची माहिती त्यांना दिली.
देशात आणि राज्यात पर्यावरण आणि वृक्षारोपण या महत्वांच्या बाबींकडे लक्ष देणा-या आणि जनासामान्यात जनजागृती करणा-या या पदभ्रमंती ध्येयवेड्यांची जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वागत केले.