बागा येथे ‘ला कॅलिप्सो’ हॉटेमध्ये गुंडागिरी, 16 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 01:23 PM2020-02-13T13:23:05+5:302020-02-13T13:32:21+5:30
कळंगुट मतदारसंघातील बागा किनाऱ्याजवळील ‘ला कॅलिप्सो’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये दंगा व कर्मचाऱ्यांसह अतिथींना ओलीस ठेवल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी 16 जणांवर गुन्हा नोंदवून अटक केली.
म्हापसा - कळंगुट मतदारसंघातील बागा किनाऱ्याजवळील ‘ला कॅलिप्सो’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये दंगा व कर्मचाऱ्यांसह अतिथींना ओलीस ठेवल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी 16 जणांवर गुन्हा नोंदवून अटक केली. दोन व्यापाऱ्यांमधील अंतर्गत वादामुळे ही घटना घडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असून सुद्धा घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी पहाटे 5 च्या सुमारास घडली. यावेळी सुमारे 40 गुंड (बाउन्सर) यानी हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे शिरकाव करून हॉटेलचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आणि तेथील कर्मचाऱ्यांसह अतिथींना ओलीस ठेवले. यावेळी हॉटेलमध्ये काही सामानाची नासधूस सुद्धा केली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक एडविन कुलासो व कळंगुट पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी पोलिस फौजफाट्यासह धाव घेतली. यावेळी हॉटेलला छावणीचे रुप आले होते.
हॉटेलच्या व्यवस्थापनाकडून केलेल्या तक्रारीनुसार, काही गुंड हे बेकायदेशीरपणे हॉटेलमध्ये घुसले व त्यांनी कर्मचाऱ्यांना तसेच अतिथींना ओलीस ठेवले. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. तसेच इतरांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, जवळपास 40 गुंडांनी हॉटेलमधील अतिथींना तसेच कर्मचाऱ्यांना धमकी दिली. यावेळी जवळपास 300 च्या वरती कर्मचारी व अतिथी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले!
नेत्यांवरील गुन्हे जनतेला कळू देत, ते वेबसाईटवर प्रकाशित करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश
China Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं नवं नाव
दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे