कोकण रेल्वे मार्गावर उद्या ३ तासांचा मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:23 PM2023-07-10T12:23:13+5:302023-07-10T12:24:13+5:30

देखभालीसाठी मेगाब्लॉक करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे.

3 hour mega block on konkan railway line | कोकण रेल्वे मार्गावर उद्या ३ तासांचा मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर उद्या ३ तासांचा मेगाब्लॉक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : संगमेश्वर रोड-भोके आणि कुडाळ-वेर्णा विभागादरम्यान देखभालीसाठी मेगाब्लॉक करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. मंगळवारी (दि.११) सकाळी ७.३० ते १०.३० वा. पर्यंत संगमेश्वर रोड भोके विभाग येथे तीन तासांचा मेगाब्लॉक असेल.

यामुळे गाडी क्र. १९५७७ तिरुनेलवेल्ली- जामनगर एक्स्प्रेसचा १० रोजी सुरू होणाऱ्या प्रवासाचे ठोकूर रत्नागिरी विभागादरम्यान अडीज तासांसाठी नियमन केले जाईल. गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्स्प्रेसच्या सोमवारी सुरू होणाऱ्या प्रवासाचे ठोकूर - रत्नागिरी विभागा दरम्यान १ तासांसाठी नियमन केले जाईल. कुडाळ-वेर्णा विभागादरम्यान बुधवारी (दि.१२) दु. ३ ते सायं. ६ वा. पर्यंत ३ तासांचा मेगाब्लॉक राहील. त्यामुळे गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या बुधवारी सुरू होणाऱ्या प्रवासाचे थिवी स्टेशनवर ३ तासांसाठी नियमन केले जाईल. गाडी क्र. १२६१८ एच. निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसचा प्रवास मंगळवारी सुरू होऊन रोहा - कुडाळ विभागादरम्यान अडीज तासांसाठी नियमन केले जाईल.

गाडी क्र. १०१०५ दिवा सावंतवाडी रोडचा प्रवास बुधवारी सुरू होणार असून रोहा-कणकवली विभागा दरम्यान ५० मिनिटांसाठी या गाडीचे नियमन केले जाईल. गाडी क्र. २२६५३ तिरुवनंतपुरम सेंट्रल एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास मंगळवारी सुरू होऊन या गाडीचे ठोकूर वेर्णा विभागा दरम्यान २ तास ५० मिनिटांसाठी नियमन केले जाईल, असे कोकण रेल्वे महामंडळाने कळविले आहे.


 

Web Title: 3 hour mega block on konkan railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.