वास्कोत झालेल्या अपघातात ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 04:31 PM2020-02-15T16:31:20+5:302020-02-15T16:31:24+5:30
अपघाताची माहीती दिल्यानंतर ४५ मिनीटाने रुग्णवाहीका घटनास्थळावर दाखल झाल्याने येथे जमलेले नागरीक संतापले.
वास्को: दक्षिण गोव्यातील वास्को शहराच्या एफएल गोंम्स महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात चंद्रशेखर सरोज नावाच्या ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. चंद्रशेखर दुचाकीने जात असताना टीळक मैदानाच्या बाहेरील परिसरात उभा करून ठेवलेल्या कंण्टेनर ट्रक ला त्याच्या दुचाकीने जबर धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखमा होऊन नंतर त्याला इस्पितळात नेत असताना वाटेवर त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर १०८ रुग्णवाहीकेला नागरीकांनी संपर्क करून सुद्धा रुग्णवाहीका ४५ मिनीटे आली नसल्याने येथे जमलेल्या नागरीकांनी याबाबत संताप व्यक्त करून वेळेवरच रुग्णवाहीका पोचली असती तर कदाचित चंद्रशेखर चा जिव वाचला असता अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.
वास्को पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक प्रमीला फर्नांडीस यांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी मध्यरात्री ११.५५ च्या सुमारास सदर अपघात घडला. पिशेडोंगरी, वास्को येथे राहणारा ३३ वर्षीय चंद्रशेखर मोटरसायकल ने (क्र: जीए ०८ डी ७००१) एफएल गोंम्स मार्गावरून सेंट अॅन्ड्रु चर्च परिसराच्या दिशेने जात असताना सदर अपघात घडला. चंद्रशेखर जेव्हा टीळक मैदानाबाहेरील परिसरात पोचला तेव्हा त्याचा दुचाकीवरील ताबा गेल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या कंण्टेनर ट्रक (क्र: जीए ०६ टी ३४८५) ला त्याच्या दुचाकीने जबर धडक दिली. यामुळे चंद्रशेखर दुचाकीवरून फेकला जाऊन त्याचे डोके जोरात उभ्या करून ठेवलेल्या ट्रकला धडकले. हा अपघात घडल्याचे परिसरातून जाणाऱ्या नागरीकांना दिसून येताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन याबाबत १०८ रुग्णवाहीकेला तसेच वास्को पोलीसांना माहीती दिली.
बऱ्याच वेळानंतर १०८ रुग्णवाहीकेने घटनास्थळावर पोचून जखमी चंद्रशेखर यास चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेले असता येथे पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. अपघात घडल्यानंतर येथे जमलेल्या नागरीकांनी त्वरित १०८ रुग्णवाहीकेला माहीती देऊन सुद्धा रुग्णवाहीका ४५ मिनीटानंतर आल्याने घटनास्थळावर जमलेल्या नागरीकांनी याबाबत संताप व्यक्त केला. १०८ रुग्णवाहीका वास्को पोलीस स्थानकावर उभी असत असल्याचे अपघाता वेळी उपस्थित असलेले प्रितम नाईक यांनी सांगून पोलीस
स्थानक व अपघाताचे ठिकाण सुमारे ६०० मीटर अंतरावरच असल्याची माहीती त्यांनी दिली. घटनेवेळी रुग्णवाहीकेवर असलेला चालक बिगरगोमंतकीय असल्याने त्याला माहीती दिल्यानंतर तो रुग्णवाहीका दुसºयाच ठिकाणी घेऊन जाण्यास निघाल्याची माहीती प्रितम नाईक यांनी देऊन जर रुग्णवाहीकेवर गोमंतकीय चालक असता तर त्याला अपघात स्थळांची माहीती असती व वेळेवर रुग्णवाहीका घेऊन आल्याने त्याचा जीव वाचला असता असे नाईक यांनी सांगितले.
रुग्णवाहीकेवर सरकारला गोमंतकीय चालक मिळत नाहीत का असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित करून सरकारने सर्वांच्या हीतासाठी याबाबत लक्ष घालून उचित पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेले नरेश नाईक यांनी वास्को व परिसराच्या भागात मुरगाव बंदरातून वाहतूक करणारे कंण्टेनर ट्रक तसेच इतर अवजड वाहने अनेक वेळा अयोग्य रित्या रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. अशाच प्रकारे टीळक मैदानाच्या बाहेरील रस्त्याच्या बाजूला अयोग्य रित्या उभ्या करून ठेवलेल्या कंण्टेनर ट्रक ला धडक दिल्याने चंद्रशेखरचा मृत्यू झाला.
भविष्यात अशा प्रकारे रस्त्यावर उभ्या करून ठेवणाºया अवजड वाहनावर वाहतूक पोलीसांनी कारवाई करण्याची गरज असून त्यांना ही अवजड वाहने का दिसून येत नाहीत असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला. शुक्रवारी मध्यरात्री अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेल्या नागरीकांनी भविष्यात जर रस्त्याच्या बाजूला अयोग्य रित्या उभ्या करून ठेवलेल्या अवजड वाहनांवर वाहतूक पोलीसांनी कारवाई केली नसल्यास याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार असा इशारा त्यांनी याप्रसंगी केला. चंद्रशेखर याच्या दुचाकीला हॅल्मेट लावून ठेवल्याचे अपघात स्थळी दिसून आले असून जर त्यांने ते घातले असते तर कदाचित तो या अपघातातून बचावला असता.
वास्को पोलीसांनी सदर अपघाताचा तसेच मयत चंद्रशेखर याच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर तो शवचिकित्सेसाठी मडगावच्या इस्पितळात पाठवून दिला. पिशेडोंगरी, वास्को येथे राहणारा चंद्रशेखर विवाहीत असून त्याला मुले असल्याची माहीती पोलीसांनी दिली. अशा अपघाती निधनामुळे त्याच्या कुटूंबात तसेच शेजाºयात दुख्खाचे वातावरण पसरलेले आहे. वास्को पोलीस सदर अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.
दिड महीन्यात रस्ता अपघातात मुरगाव तालुक्यात चार जणांचा मृत्यू
मुरगाव तालुक्यात जानेवारी महीन्याच्या सुरवातीपासून अजून पर्यंत झालेल्या रस्ता अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन अपघात वेर्णा महामार्गावर घडलेले असून शुक्रवारी (दि. १४) मध्यरात्री वास्कोच्या एफएल गोंम्स मार्गावर चौथा जीव घेणारा अपघात घडला.
मागच्या दिड महीन्यात मुरगाव तालुक्यात झालेल्या रस्ता अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला. यापैंकी पहीला अपघात ९ जानेवारीला घडला. वेर्णा चौपदरी महामार्गाच्या बाजूने चालत जात असलेल्या ६० वर्षीय वृद्ध चंद्रप्पा खातापूर यास दुचाकीने जबर धडक देऊन झालेल्या अपघातात चंद्रप्पा मरण पोचला होता. ८ फेब्रवारी ला आपल्या पतीसहीत दुचाकीने जात असताना ट्रेलर या अवजड वाहनाबरोबर झालेल्या अपघातात ६० वर्षीय डोनेता डीसोझा ही वृद्ध महीला ट्रेलर च्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली होती. सदर अपघातात डोनेता हीचा पती रस्त्याच्या बाहेर पडल्याने सुदैवाने सुखरूप बचावला होता.
सदर अपघात घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात ९ फेब्रुवारीला वेर्णा महामार्गावर अन्य एक भीषण अपघात घडून यात २० वर्षीय रसल फर्नांडीस नावाच्या युवक चालकाला आपला जीव गमवावा लागला. ताळगाव येथील रसल टॅक्सीने चार जणांच्या एका कुटूंबाला (पती, पत्नी व दोन लहान मुले) घेऊन मडगावच्या दिशेने जात असताना त्यांने पिर्णी जंक्शनसमोर समोरून जाणाऱ्या अन्य एका वाहनाला ‘ऑव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला असता पुढच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरला त्याच्या चारचाकीची जबर धडक बसली. सदर अपघातात रसल फर्नांडीस हा युवक चालक जागीच ठार झाला असून यात ते कुटूंब जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मागच्या दिड महीन्यात वेर्णा महामार्गावर झालेल्या या तीन अपघाताबरोबरच शुक्रवारी मध्यरात्री वास्कोत झालेल्या अपघातात चंद्रशेखर सरोज या चौथ्या इसमाला आपला जीव गमवावा लागला.