पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत सुरु केल्या जाणाऱ्या ६० पैकी ४० इलैक्ट्रीक बसेस या हैदराबाद येथील कंपनीकडून सरकारने घेतल्या आहेत. सरकार परप्रांतीय कंपन्यांचे खिसे भरत असल्याचा आरोप खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
या इलैक्ट्रीक बसेस सुरु करण्यासाठी पणजीत सध्या कार्यरत असलेल्या खासगी बसेस बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याला आमचा आक्षेप आहे. त्याबाबत ९ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल. आमच्या रोजगारावर गदा आणण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ताम्हणकर म्हणाले, की या ६० इलैक्ट्रीक बसेस यापैकी १० बसेस या स्मार्ट सिटी निधीमधून , १० बसेस गोवा मुक्तीला ६० वर्ष पूर्ण झाल्याने केंद्र सरकारने दिलेल्या विशेष निधीमधील तर उर्वरीत ४० बसेस या हैदराबाद येथील एका कंपनीकडून सरकारने घेतल्या आहेत. या ४० बसेस चालवण्यासाठी सरकार या कंपनीला प्रती किलो मीटर ७५ रुपये देणार असल्याचा आरोप त्यांनी केला.