स्पिरिट ऑफ गोवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती

By समीर नाईक | Published: May 21, 2024 04:07 PM2024-05-21T16:07:42+5:302024-05-21T16:09:09+5:30

राज्याच्या संस्कृतीच्या अनोख्या परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्ती साजरे करून, हे कार्यक्रम राज्याची ओळख टिकवून ठेवण्यास, आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत करतात, असे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका यांनी सांगितले.

A spontaneous response to Spirit of Goa | स्पिरिट ऑफ गोवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती

स्पिरिट ऑफ गोवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती

कोलवा: पर्यटन खात्याने आयोजित केलेल्या तीन दिवसीय "स्पिरिट ऑफ गोवा" महोत्सव उत्साहात संपन्न झाला. दक्षिण गोव्यातील कोलवा येथील सागच्या मैदानावर पार पडलेल्या या महोत्सवाला हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावत राज्यातील प्राचीन सांगीतिक संस्कृतीचा अनुभव घेतला.

स्पिरिट ऑफ गोवा सारखे महोत्सव गोव्याचे संगीत, खाद्यपदार्थ, पारंपारिक नृत्यांचे जतन आणि प्रचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा महोत्सव स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी, पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी आणि उपस्थितांमध्ये समुदायाची भावना वाढवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात. राज्याच्या संस्कृतीच्या अनोख्या परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्ती साजरे करून, हे कार्यक्रम राज्याची ओळख टिकवून ठेवण्यास, आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत करतात, असे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका यांनी सांगितले.

स्पिरिट ऑफ गोवा फेस्टचा मुख्य उद्देश गोव्यातील संगीत, खाद्यपदार्थ आणि स्थानिक समुदायाला प्रोत्साहन देणे हा आहे. पारंपारिक नृत्य, संगीत, खाद्यपदार्थ याव्यतिरिक्त, उत्सवामध्ये विविध उत्पादने, तसेच उराक, फेनी, आणि निरो सारखी पेये, पाककृती आणि नारळ आणि काजूपासून बनवलेल्या हस्तकला प्रदर्शित करण्यासाठी या महोत्सवाने एक व्यासपीठ म्हणून काम केले. मातीचे भांडे बनवण्याच्या दालनाने अभ्यागतांना गोव्याच्या पारंपारिक हस्तकलेचा अनुभवही दिला.

या कार्यक्रमात गोव्याच्या विविध संगीत कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमांचा समावेश होता. फोरफ्रंट, प्युअर मॅजिक आणि द इम्पीरियल यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रसिद्ध कांता गावडे यांनी आपल्या कला पथकाने महोत्सवात अधिक रंगत आणली. इतर ठळक गोष्टींमध्ये गोवाज प्राईड, हेमा सरदेसाई यांचे मनमोहक सादरीकरण आणि अल्टिट्यूड, ज्यूकबॉक्स ट्राय, ट्वेंटीफोरके (२४K) इंडिया, क्रिमसन टाइड आणि बँड ॲम्बेसेडरचे डायनॅमिक सेट यांचा समावेश होता.

Web Title: A spontaneous response to Spirit of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.