गोव्यात बालरथ कर्मचा-यांना मुता-या धुण्याची कामे, संघटनेकडून निषेध; पगारवाढीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 06:54 PM2017-12-12T18:54:57+5:302017-12-12T19:05:08+5:30
विविध विद्यालयांना देण्यात आलेल्या बालरथ बसगाडीच्या चालकांना आणि सहाय्यकाला मुतारी धुण्याचे आणि झाडू मारण्याची कामेही करून घेतली जात असल्यामुळे बालरथ कर्मचारी संघटनेकडून तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणो पगारवाढ देण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
पणजी: विविध विद्यालयांना देण्यात आलेल्या बालरथ बसगाडीच्या चालकांना आणि सहाय्यकाला मुतारी धुण्याचे आणि झाडू मारण्याची कामेही करून घेतली जात असल्यामुळे बालरथ कर्मचारी संघटनेकडून तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणो पगारवाढ देण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
गोव्यातील विविध विद्यालयात बालरथसाठी काम करणारे 9क्क् हून अधिक कर्मचारी आहेत. या कर्मचा:यांना देण्यात येणारा पगार हा अत्यल्प असून अजूनही त्यात वाढ करण्यात आलेली नाही. चालकांना 1क् हजार रुपये तर सहाय्यकांना 5 हजार रुपये पगार देण्यात येत आहे. चालकांना 2क् हजार रुपये तर सहाय्यकांना 14 हजार रुपये वेतन करण्यात यावे ही संघटनेची मागणी होती. पगार वाढ करण्याची मागणी करून निदर्शने व संप केल्यानंतर सरकारकडून त्यांना पगार वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. त्यामुळे बालरथ कर्मचारी संघटनेने पणजीत आझाद मैदानात निदर्शने केली.
या कर्मचा:यांची काही विद्यालयात कशा प्रकारे छळणूक होत आहे याची माहितीही कर्मचा:यांनी कथन केली. कुठलीही तक्रार घेऊन गेल्यास व्यवस्थापन सरकारकडे बोट दाखविते आणि सरकारकडून व्यवस्थापनाकडे बोट दाखविले जाते. संडास, मुतारी धुण्यापासून झाडू मारण्यास आणि झाडांना पाणी देण्याची कामेही त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत. व्यवस्थापनाकडून अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे. वास्तविक विद्याथ्र्याना सकाळी शाळेत नेऊन पोहोचविणो आणि नंतर शाळा सुटल्यावर घरी सोडणो यापलिकडे त्यांचे काम नाही असे सरकारकडून त्यांना सांगण्यात आले होते. परंत विद्यालयाकडून त्यांच्याकडून दिवसभर कामे करून घेतली जातात. संध्याकाळी मुलांना वर्ग असल्यामुळे तेव्हाही बोलावले जाते अशी माहिती कर्मचा:यांनी दिली. परंतु याला अपवादही काही विद्यालये असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या सेवा दल निमंत्रक स्वाती केरकर आणि अजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. यावेळी स्वाती केरकर यांनी या कर्मचा:यांच्या समस्या कथन केल्या. सरकारकडे वारंवार मागण्याकरूनही आणि त्यासाठी लोकशाही मार्गाने निदर्शने करूनही त्यांना कुणीच गांभीर्याने घेत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गोवा विधानसभा अधिवेशन बुधवारपासून सुरू होत असल्यामुळे या सदस्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शने करण्यात अल्याचे त्यांनी सांगितले.